निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळली, पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळली, पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची प्रक्रिया आता आणखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत हा खटला पुढे ढकलला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची प्रक्रिया आता आणखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत हा खटला पुढे ढकलला आहे. याआधी केंद्र सरकारने मुकेश, विनय आणि अक्षय यांना फाशी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता मंगळवारी दोन वाजता यावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी होणार आहे.

त्यामुळं मुकेश, विनय आणि अक्षय यांचे कायदेशीर पर्याय संपले आहेत, असे वाटत असतानाच त्यांची फाशी आणखी पुढे गेली आहे. तर, पवनला नंतर फाशी दिली जाऊ शकते. पवनच्या क्युरेटिव्ह याचिका आणि मार्की याचिका अद्याप प्रलंबित आहेत.परंतु कायद्यानुसार दोषी दोषींपैकी जोपर्यंत एक पर्याय शिल्लक नाही तोपर्यंत कोणालाही फाशी दिली जाऊ शकत नाही. म्हणजेच सर्वांना एकत्र फाशी देण्यात येईल. आता या प्रकरणात सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आदेश देईल. म्हणजे, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल आणि निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार नाही.

'निर्भया' प्रकरणानं देश हादरला

16 डिसेंबर, 2012 रोजी 23 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत दक्षिण दिल्लीत फिरण्यासाठी गेली होती. यावेळी चित्रपट पाहून घरी परतत असताना बस स्टँडवर मित्रासोबत बसची वाट पाहत उभी होती. यावेळी तिथून जाणाऱ्या एका खासगी बसमधून त्यांनी प्रवास केला. एका अल्पवयीन मुलासोबत सहा नराधमांनी तिच्यावर चालत्या बसमध्ये बलात्कार केला. तिला अमानुष मारहाणही केली. यानंतर पीडितेला बसमधून फेकून देण्यात आलं. गंभीररीत्या जखमी निर्भयावर रुग्णालयात उपाचार झाले. त्यानंतर तिला उपचाराकरिता एअरलिफ्ट करून सिंगापूरला घेऊन जाण्यात आलं. अखेर तिनं 29 डिसेंबर, 2012 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. निर्भयाच्या चार गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एक गुन्हेगार अल्पवयीन असल्याने याआधीच त्याची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली होती. तिथून शिक्षा भोगल्यावर त्याची सुटका झालेली आहे. एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. उर्वरित चार गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र काही कायदेशीर बाबींमुळे त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.

First published: February 7, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या