माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज यांनी राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 11:41 PM IST

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली 6 ऑगस्ट :  माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. रात्रीपर्यंत त्या लोकसभेतलं कामकाज बघत होत्या. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना  त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.पण उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. लोकसभेत कलम 370 बाबतचं विधेयक मंजूर झाल्यानंतर  तीन तासांपूर्वीच त्यांनी ट्विटही केलं होतं. प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी.  असं ट्विट करत त्यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं होतं. तर काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही अभिनंदन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अतिशय समर्थपणे परराष्ट्रमंत्रालय सांभाळलं होतं.

त्या सात वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्या हरियाणात पहिल्यांदा मंत्री झाल्या.

Loading...

उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती. परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर त्या अतिशय सक्रिय होत्या.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी कठोर मेहेनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगभरात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत केली. त्याचा शेकडो लोकांना फायदा झाला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग,डॉ हर्षवर्धन यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज एम्समध्ये दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 11:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...