News18 Lokmat

देव तारी त्याला कोण मारी! 'ते' प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले

साधारण अर्धातासाच्या फरकाने केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 11:43 AM IST

देव तारी त्याला कोण मारी! 'ते' प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : दिल्लीतील करोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला भीषण आग लागली आहे. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गोवा इथून दिल्लीत प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

गोवा येथून दिल्ली दर्शनासाठी निघालेली डिलर्सची बस नुकतीच हॉटेल अर्पित पॅलेस इथे पोहोचली होती. रूम्स घेणार तोच या दुर्घटनेबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला समजलं. आरडा-ओरड सुरू झाल्यावर सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आणि सर्व प्रवासी बचावले. साधारण अर्धातासाच्या फरकाने केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले.

त्यानंतर प्रसंगावधान ठेवून सहल व्यवस्थापकांनी सर्व पर्यटकांची व्यवस्था दुसऱ्या हॉटेल्समध्ये केली आहे. त्यानंतर या सर्व प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दिल्लीतील हॉटेलमध्ये आग

करोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. या भीषण आगीत अनेकजण जखमीदेखील झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीजण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.

Loading...

दरम्यान, ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक तासांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचं स्वरूप इतकं भीषण आहे की अजूनही विझवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे.

आग लागलेल्या अर्पित हॉटेलमध्ये 40 रूम असून केरळमधून दिल्लीत आलेले सात जण याच अर्पित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...