News18 Lokmat

दिल्लीत हॉटेलला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू

अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असुन अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 10:13 AM IST

दिल्लीत हॉटेलला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली, 12 फेब्रुवारी : दिल्लीतील करोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला भीषण आग लागली आहे. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असुन अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

करोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला पहाटेच्या सुमारास ही आग लागली आहे. या भीषण आगीत अनेकजण जखमीदेखील झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीजण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक तासांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचं स्वरूप इतकं भीषण आहे की अजूनही विझवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे.

आग लागलेल्या अर्पित हॉटेलमध्ये 40 रूम असून केरळमधून दिल्लीत आलेले सात जण याच अर्पित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Loading...

VIDEO : मुंबईत गिरीश बापटांच्या बंगल्याला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...