मराठी बातम्या /बातम्या /देश /

LIVE Delhi Exit Poll Result 2020: दिल्लीत मोदी-शहा मॅजिकचा धुव्वा उडवत पुन्हा केजरीवाल! इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

LIVE Delhi Exit Poll Result 2020: दिल्लीत मोदी-शहा मॅजिकचा धुव्वा उडवत पुन्हा केजरीवाल! इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

Delhi Exit Poll Results 2020 Live updates निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं.

Delhi Exit Poll Results 2020 Live updates निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं.

Delhi Exit Poll Results 2020 Live updates निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं.

    नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Exit Poll Results 2020 Live updates ) आज मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर आलेल्या काही संस्थांच्या एक्झिट पोल्सने दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा, भाजपला 5 ते 19 जागा तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोल सांगतो. 'टाइम्स नाऊ'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 'आप'ला 44 जागा तर भाजप 26 जागा मिळतील, मात्र काँग्रेसला भोपळा फोडता येणार नाही. 'रिपब्लिक'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत कोण मारणार बाजी? AAP : 48-61 BJP : 9-21 CONG : 0-1 Newsx- Neta चा एक्झिट पोल काय सांगतो? AAP: 50-56 BJP: 10-14 Congress: 0 2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. मागील निवडणुकीत कोणते मुद्दे ठरले प्रभावी? अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचं अल्पमतातील सरकार कोसळून दिल्लीत 2015 साली पुन्हा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत केजरीवालांचीच जादू दिसून आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. नरेंद्र मोदी यांचं लोकप्रियतेच्या वादळाची दिल्लीच्या मैदानात मात्र अरविंद केजरीवालांनी हवा काढून टाकली. पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अशा मुद्द्यांवरून केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनांवर दिल्लीच्या जनतेनं विश्वास टाकला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. यंदा दिल्लीतील ओपिनियन पोल काय सांगतात? दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. निवडणुकांपूर्वी विविध संस्थांचे ओपिनियन पोल येत असतात. या ओपिनियन पोलनी आम आदमी पार्टीवर पुन्हा एकदा दिल्लीची जनता विश्वास दाखवेल, असा अंदाज वर्तवला आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी मजबूत असून या निवडणुकीत ते 54-60 जागांवर विजय मिळवू शकतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला 10-14 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, कॉंग्रेसला केवळ 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. काय आहे ABP News- C Voter Opinion Poll च्या पोलचा अंदाज? AAP- 42 ते 56 भाजप- 10 ते 24 काँग्रेस- 0 ते 4
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Delhi election

    पुढील बातम्या