Home /News /national /

दिल्ली निवडणूक : अच्छे होंगे 5 साल, दिल्ली मे तो केजरीवाल!

दिल्ली निवडणूक : अच्छे होंगे 5 साल, दिल्ली मे तो केजरीवाल!

केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या भाषणात स्वत:ला दिल्लीकरांच्या कुटुंबातील मोठा मुलगा असल्याचे सांगत आहेत

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) मतदानाच्या पूर्वी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) कॅम्पेन नारा बदलला आहे. पहिल्यांदा आपची कॅम्पेन लाइन होती, ‘अच्छे बीते 5 साल, लगे रहो केजरीवाल’ ज्यात बदल करण्यात आला असून आता आपची पंचलाइन आहे ‘अच्छे होंगे 5 साल, दिल्ली में तो केजरीवाल’. ‘आप’ची निवडणुकीपूर्व तयारी पार्टीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यापासूनच आपची रणनीती ठरलेली होती. त्यानुसार पंचलाइनमध्येही बदल करण्यात आला आहे. पंचलाइनबरोबरच केजरीवालांच्या बॅनर, हॉर्डिंग्सवरही बदल करण्यात आला आहे. केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या भाषणात स्वत:ला दिल्लीकरांच्या कुटुंबातील मोठा मुलगा असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकड़े दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरू असलेल्या प्रचारादकम्यान आपला मोठा झटका बसला आहे. कोंडलीचे आमदार मनोज कुमार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीत एका रॅलीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मनोज कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तिकीट मिळालं नसल्याने मनोज कुमार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दशकांपासून भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. 2020 ची निवडणूकही त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप पक्ष अधिक निश्चयी दिसत आहे. गेल्या पाच वर्षात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष भाजप हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाच्या जोरावर निवडणूक लढत आहे. दिल्लीकरांच्या केंद्राच्या निर्णयावर विश्वास आहे. केवळ मोदी व शहा यांच्या नावावरुनच भाजपचा 21 वर्षांचा वनवास संपेल का? हा प्रश्नच आहे. तसं पाहता निवडणुकांचे समीकरण कधी बदलतील हे सांगता येत नाही.भारतीय जनता पक्षाकडे कोणतंही स्थानिक नेतृत्व नाही. यापूर्वी दिल्लीत कोणी एका काळात मदनलाल खुराना होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत भाजपचे नेतृत्व दिसून येत नाही. माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल हे दिल्लीतील मोठे स्थानिक नेते आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत ते फार सक्रिय नसल्याने भाजपला गोयल यांच्या प्रसिद्धीचा फार फायदा होईल, असे वाटत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi election, Kejrival

    पुढील बातम्या