दिल्लीत गेलेल्या स्टार प्रचारकाचा ट्विटरवर ‘विनोद’ झाला! सोशल मीडियावर अशी उडवली खिल्ली

दिल्लीत गेलेल्या स्टार प्रचारकाचा ट्विटरवर ‘विनोद’ झाला! सोशल मीडियावर अशी उडवली खिल्ली

विनोद तावडे यांनी आपल्या दिल्लीतील सभेचा फोटो ट्विटरवर अपलोड केला आणि नेटिझन्सकडून त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. तावडे यांनी आपल्या दिल्लीतील सभेचा फोटो ट्विटरवर अपलोड केला आणि नेटिझन्सकडून त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. एकता विहार, साऊथ अव्हेन्यू, आर. के. पुरम येथील स्थानिकांशी विनोद तावडे यांनी संवाद साधला. यावेळी भाजपाचा दिल्लीसाठी असलेला विकास आराखडा, भाजपाने केलेली विकास कामे याविषयीची माहिती दिली. पण ही सभा नेटिझन्समध्ये वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने विनोद तावडेंना उमेदवारांच्या तिकीट यादीतून वगळलं. परंतु, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना जबाबदारी कायम देण्यात आली. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत विनोद तावडेंचा समावेश करण्यात आला. विनोद तावडे सध्या दिल्लीत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे.

या प्रचाराचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताच त्यांना नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागलं. त्यांच्या सभेला दिल्लीकरांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे विनोद तावडे ट्रोल झाले. ही संधी महाराष्ट्रामधील नेत्यांनीही साधली.

प्रचार म्हटला की ट्रोल तर होणारच!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी निकाल युतीच्या बाजूने होतं, असं जनमत होतं. परंतु, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची साताऱ्याची एक सभा झाली आणि निवडणुकीचा निकाल काय लागला, हे आपण सर्वांनीच पाहिलं. पवारांची पावसात झालेली सभा आणि त्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सचा मिळालेला प्रतिसाद, यानंतर निकालाचं चित्र पालटलं, हे राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण आहे. विनोद तावडेंच्या बाबतीत काहीस वेगळं झालं आहे. त्यांच्या सभेला गर्दीच जमली नसल्याने ट्विटरवर त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे.

‘भाजपाचे स्टार प्रचारक विनोद तावडे यांची दिल्लीमधली विराट सभा’

‘…म्हणूनच महाराष्ट्र भाजपाने यांना तिकीट नाकारले का?’

‘पाय ठेवायलाही जागा नाही’

'20 लोकांची गर्दी'

'भाषणाला लोकांची वाढती गर्दी'

First published: January 30, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या