दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना टक्कर देणार भाजपचा 'हा' वकील

दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना टक्कर देणार भाजपचा 'हा' वकील

दिल्ली निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार?

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून आज काही पक्षांनी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. दिल्ली निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपमधून सुनील यादव निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. सुनील यादव हे पेशाने वकील असून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. काल सोमवारी रात्री यादवांच्या नावाची घोषणा झाली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते, त्यानंतर त्यांनी प्रदेश अध्यक्षपदही भूषविले होते. भाजपमधील तरुण नेतृत्व दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरवून केजरीवाल यांना आव्हान देण्यात येणार आहे.

शीला दीक्षितला हरवलं होतं...

दिल्लीच्या माजी मुख्य़मंत्री शीला दीक्षित यांना आपचे अरविंद केजरीवाल यांनी 2013च्या विधानसभा निवडणुकीत मात दिली होती. भाजपबरोबर कॉंग्रेसनेही केजरीवाल विरोधात उमेदवार दिला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रोमेश सब्बरवाल केजरीवाल विरोधात कॉंग्रेसमधून निवडणूक लढवणार आहेत.

22 फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यमान विधानसभा होणार बरखास्त

दिल्लीची विद्यमान विधानसभा 22 फेब्रुवारी रोजी बरखास्त होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज कृभरण्याची सुरुवात झाली आहे. तर 21 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित असून 58 खुल्या वर्गातील आहेत.

First published: January 21, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या