मोदींना दिली 'छत्रपतीं'ची उपमा; भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या अजब ट्वीटमुळे खळबळ

मोदींना दिली 'छत्रपतीं'ची उपमा; भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या अजब ट्वीटमुळे खळबळ

'दिल्ली विधानसभा चुनाव का संदेश' असं म्हणत दोन- तीन ट्वीट करण्यात आली आहेत. त्यात छत्रपति मोदी जिन्दाबाद। अशी घोषणाही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजपच्या एकेकाळच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांच्या एका Tweet मुळे पक्षाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख छत्रपती असा करत दिल्लीच्या निवडणुकीत पराभव होऊनही उमा भारतींनी मोदींचाच जयजयकार केला आहे. या त्यांच्या Tweets मुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 'दिल्ली विधानसभा चुनाव का संदेश' असं म्हणत उमा भारती यांनी दोन -तीन ट्वीट करत मोदींचंच अभिनंदन केलं आहे.

'संपूर्ण देशाच्या जनतेने मोदींना आत्मसात केलं आहे आणि मोदींनी जनतेला आत्मसात केलं आहे. छत्रपती मोदी झिंदाबाद', असं उमा भारती यांनी लिहिलं आहे.

दिल्ली निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव दिसत असताना उभा भारतींनी केलेल्या ट्वीटचा नेमका अर्थ काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजपला 70 पैकी फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागेल, अशी चिन्ह आहेत. 63 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचा पराभव होणार आणि केजरीवालांचं सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे. तरीही भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी अशा पद्धतीचं Tweet केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. मोदींच्या अंधभक्तांसारखं उमा भारती यांनीही जयजयकार केला आहे, असं काही यूजर्सचं म्हणणं आहे. तर काहींना यात काहीतरी काळंबेरं दिसत आहे. उमा भारतींच्या या Tweet मध्ये उपहास असल्याचं काहींना वाटतंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2020 03:06 PM IST

ताज्या बातम्या