Home /News /national /

काँग्रेसला झटका! बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; वडील म्हणतात 'मला माहीत नाही'

काँग्रेसला झटका! बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; वडील म्हणतात 'मला माहीत नाही'

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानेही निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर वडीलही यथावकाश काँग्रेस सोडून भाजपच्या गोटात सामील झाले. आता या नेत्याच्या बाबतीतही तेच होणार का?

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीची निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाने भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. दिल्ली विधानसभेसाठी येत्या 8 फेब्रुवारीला मतदान आहे. त्यापूर्वीच जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा समीर द्विवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यालयात त्यांनी रीतसर पक्षप्रवेश केला. आपल्या मुलाच्या भाजपच्या गोटातल्या प्रवेशाविषयी वडिल मात्र अनभिज्ञ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. समीर द्विवेदी भाजपमध्ये जाणार याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरू होती. मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जनार्दन द्विवेदीसुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का याची चर्चा आता रंगली आहे. महाराष्ट्रात साधारण हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीआधी होती. राधाकृष्ण विखेपाटील या विरोध पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा विखेपाटीलसुद्धा पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली. पण त्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं सांगितलं होतं. पण यथावकाश त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात सत्तेचे फासे पलटले, हा भाग वेगळा. पण आता तीच परिस्थिती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी दिसत आहे. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंबंधीचं कलम 370 काढून टाकायचा निर्णय घेतला. तसं विधेयक संमत करून घेतलं. त्या वेळी या जनार्दन द्विवेदी यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. माझे राजकारणातले गुरू राममनोहर लोहिया या कलमाच्या विरोधात होते, असं त्यांनी त्या वेळी सांगितलं होतं. तेव्हापासूनच जनार्दन द्विवेदी यांचा भाजपकडे ओढा असल्याचं बोललं जात होतं.पण आता द्विवेदी यांच्या मुलाने औपचारिकपणे प्रवेश केल्यानंतर जनार्दन द्विवेदीसुद्धा पक्ष सोडणार का याची चर्चा सुरू झाली आहे. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला, त्याबद्दलची प्रतिक्रिया देताना वडील जनार्दन व्दिवेदी यांनी मात्र आपल्याकडे याची माहिती नाही, असं सांगितलं आहे. माझ्या मुलाने असा काही निर्णय घेतला असेल, तर मला कल्पना नाही. त्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. तो त्याचा स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय असेल, असंही जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलं आहे. समीर द्विवेदी यांनी मात्र याविषयी वडिलांशी बोलणं झालं असल्याचं सांगितलं आहे. "मी राजकारणात येणं हा माझा एकट्याचा स्वतंत्र निर्णय आहे. आम्ही तीन भावंडं आहोत आणि आमच्यातलं कोणीही राजकारणात येऊ नये, अशी वडिलांची इच्छा होती. कारण राजकारणात उसंत नसते, अनथँकफूल जॉब आहे. पण मी राजकारणात यायचं ठरवलं आणि तो माझा स्वतंत्र निर्णय आहे", असं समीर म्हणाले. --------------------------------- अन्य बातम्या नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक Ground Report : केजरीवाल यांच्या प्रचारतंत्र पुढे भाजपचे नेते हतबल त्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळा, हिंगणघाट पीडितेच्या आईची मागणी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: BJP, Delhi election, Janardan Dwivedi

    पुढील बातम्या