Home /News /national /

'हर हर मोदी'ला, 'घर घर केजरीवालचं' उत्तर! देशाच्या राजकारणात पहिलाच प्रयोग

'हर हर मोदी'ला, 'घर घर केजरीवालचं' उत्तर! देशाच्या राजकारणात पहिलाच प्रयोग

आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच अशा अनोख्या प्रयोगाच्या माध्यमातून एखादा राजकारणी आपल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आपल्या दारावर येतोय.

    नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यातून सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आहे. दिल्ली जिंकायचीच असा चंग बांधलेल्या भाजपनं आपली सगळी ताकद झोकून दिली आहे. भाजपकडून शाहीनबागचा मुद्दा उचलून धरत निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग देत पुन्हा 'हर हर मोदी'चा जप सुरू केलाय. तर केजरीवाल यांनी पाच वर्षात केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'घर घर केजरीवाल'चा नारा दिला आहे. आपली कामं दिल्लीच्या जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी केजरीवाल  यांनी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच अशा अनोख्या प्रयोगाच्या माध्यमातून एखादा राजकारणी आपल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आपल्या दारावर येतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल www.welcomekejriwal.in या वेबसाइटच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रत्येक नागरिकाच्या घरी पोहोचताहेत. या वेबसाइटवर तुम्ही गेलात तर आधी ते तुमच्या घरी येण्याची परवानगी घेतात. आपण परवानगी दिल्यास आपल्या पाच वर्षाच्या कामांचा हिशेब देण्यासाठी ते सज्ज होतात. पुढच्या पानावर पाच वर्षात त्यांच्या सरकारनं वेगवेगळ्या विभागात केलेलं काम तुम्हाला केजरीवाल सांगतात. त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात समाजातला मोठा वर्ग आज इंटरनेटनं जोडला गेलेला आहे. त्याला त्याच्या भाषेत, त्याच्या माध्यमातून भेटणं आणि त्याच्याशी संवाद साधणं ही या वेबसाईडच्या मागची कल्पना आहे. केजरीवाल यांच्या या अनोख्या प्रयोगाचं सोशल मीडियावर अनेकांना कौतूक वाटतंय. पाहा VIDEO : दिल्लीच्या रोड शो मध्ये गृहमंत्री अमित शहांनी उंचावली तलवार निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर कसा करावा हे भाजपकडून शिकावं असं म्हटलं जातं. भाजपच्या आक्रमक सोशल मीडिया कॅम्पेनमधून इतर पक्षांनीही आपले आयटी सेल उभे केले. यात भाजपच्या तोडीनं आम आदमी पक्षही सोशल मीडियाच्या वापरात अग्रेसर असतो.  दिल्लीतल्या 2015 च्या विधानसभा निवडणुकीतही आपनं भाजपला घाम फोडला होता. यावेळीही भाजपच्या आक्रमक प्रचाराला केजरीवाल यांनी अनोख्या पद्धतीनं उत्तर दिलंय. अरविंद केजरीवाल एका क्लिकवर मतदारांच्या घरी पोहोचताहेत. पण पाच वर्षात केलेल्या कामांनी त्यांना मतदारांच्या मनात किती जागा मिळते का हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. ----------------- अन्य बातम्या जेटनंतर मोदी सरकारला मोठा धक्का, GDP चा दावा आंतरराष्ट्रीय संस्थेने ठरवला खोटा सोशल मीडियावर चव्हाण आणि थोरात समर्थकांची बॅटिंग; काँग्रेसमधली अंतर्गत स्पर्धा स्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली? CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा भाजप खासदाराने राजीव गांधींचा 'राजीव फिरोज खान' असा केला उल्लेख
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Arvind kejariwal, Delhi election, Election campagin, Website

    पुढील बातम्या