मराठी बातम्या /बातम्या /देश /

दुबईत ऑपरेशनचा खर्च सांगितला 24 लाख; आपल्या देशातल्या डॉक्टरांनी साडेतीन लाखात जोडला तुटलेला अंगठा

दुबईत ऑपरेशनचा खर्च सांगितला 24 लाख; आपल्या देशातल्या डॉक्टरांनी साडेतीन लाखात जोडला तुटलेला अंगठा

एका अपघातात दुबईत सुतारकाम करणाऱ्या संदीपचा अंगठा तुटल्याने जगण्याचा मार्गच बंद झाल्यासारखं वाटलं. पण तुटलेला अंगठा घेऊन 18 तास प्रवास करत तो दिल्लीत पोहोचला आणि डॉक्टरांनीही कमीत कमी खर्चात त्याची शस्त्रक्रिया केली.

एका अपघातात दुबईत सुतारकाम करणाऱ्या संदीपचा अंगठा तुटल्याने जगण्याचा मार्गच बंद झाल्यासारखं वाटलं. पण तुटलेला अंगठा घेऊन 18 तास प्रवास करत तो दिल्लीत पोहोचला आणि डॉक्टरांनीही कमीत कमी खर्चात त्याची शस्त्रक्रिया केली.

एका अपघातात दुबईत सुतारकाम करणाऱ्या संदीपचा अंगठा तुटल्याने जगण्याचा मार्गच बंद झाल्यासारखं वाटलं. पण तुटलेला अंगठा घेऊन 18 तास प्रवास करत तो दिल्लीत पोहोचला आणि डॉक्टरांनीही कमीत कमी खर्चात त्याची शस्त्रक्रिया केली.

दिल्ली, 5 डिसेंबर: वैद्यकशास्त्र (Medical Science) प्रगत झालं असल्यानं तुटलेला अवयव जोडणंही शक्य आहे. तसंच, अन्य देशांच्या तुलनेत भारतात अशा शस्त्रक्रिया कमी खर्चात होणंही शक्य आहे. दिल्लीतल्या आकाश हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या एका शस्त्रक्रियेवरून हे सिद्ध झालं आहे. तिथल्या डॉक्टर्सनी एका व्यक्तीचा तुटलेला अंगठा प्रगत तंत्राच्या साह्याने सलग सहा तास शस्त्रक्रिया (Surgery) करून परत जोडला आहे. तसंच, दुबईत त्या शस्त्रक्रियेसाठी 24 लाख रुपये खर्च येणार होता, ती शस्त्रक्रिया दिल्लीतल्या या हॉस्पिटलमध्ये चार लाख रुपयांहून कमी खर्चात झाली. त्यामुळे हे हॉस्पिटल सध्या विशेष चर्चेत आलं आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. राजस्थानमधला (Rajasthan) संदीप कुमार नोकरीनिमित्ताने दुबई (Dubai) येथे वास्तव्यास होता. तिथे तो सुतारकाम (Carpenter) करत होता. एक दिवस काम करताना अचानक त्याचा अंगठा (Thumb) तुटला. त्यानंतर त्याचे सहकारी त्याला जवळच्या रूग्णालयात घेऊन गेले. हा अंगठा परत जोडण्यासाठी 4 तासांच्या आत शस्त्रक्रिया करणं आवश्यक असून, त्याकरिता 24 लाख रुपये खर्च येईल, असं तिथल्या डॉक्टर्सनी सांगितलं. हा खर्च संदीपला परवडणारा नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी भारतात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 9 वर्षीय बालक करायचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलीसही चक्रावले 18 तासांचा प्रवास करून संदीप दिल्लीतल्या (Delhi) आकाश हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. या दरम्यान संदीपच्या जखमेतून 300 मिली रक्तस्राव झाला होता. आकाश हॉस्पिटलमध्ये त्याच्या शस्त्रक्रियेची पूर्ण तयारी करण्यात आली होती. 6 डॉक्टरांच्या पथकानं शस्त्रक्रिया सुरू केली आणि संदीपचा अंगठा परत जोडण्यात आला. याबाबत डॉ. आशिष चौधरी यांनी सांगितलं, की `अंगठा हा हाताचा महत्त्वपूर्ण भाग असतो. माणूस अंगठ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. रक्तस्राव अधिक झाल्यानं आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास उशीर झाल्यानं गुंतागुंत वाढली होती; मात्र अशा स्थितीतही डॉक्टर्सनी प्रयत्नांची शर्थ करत अंगठा पुन्हा जोडला.` एखाद्या अपघातात किंवा अन्य कारणामुळे एखादा अवयव तुटला तर नेमकं काय करायचं याविषयी जनजागृती निर्माण होणं आवश्यक आहे. याबाबत माहिती देताना डॉ. आशिष चौधरी यांनी सांगितलं, की `कोणत्याही कारणामुळे शरीराचा कोणताही अवयव तुटला तर तो आइस बॉक्समध्ये (Ice box) ठेवावा. त्यामुळे त्यातल्या पेशी (Tissue) नष्ट होत नाहीत आणि 24 तासांच्या आत शस्त्रक्रिया करून तो पुन्हा जोडता येतो. तुटलेला अवयव थेट आइस बॉक्समध्ये ठेवू नये. सर्वप्रथम असा अवयव पॉलिथीनच्या पिशवीत ठेवावा आणि ही पिशवी आइस बॉक्समध्ये ठेवावी. संदीपने असं केल्यानं 22 तासांनंतरही शस्त्रक्रिया करून अंगठा जोडणं शक्य झालं.` भारत-पाकिस्तान युद्धामधल्या ‘हिरो’नं चुकवली 68 वर्षांपूर्वीची उधारी! डॉ. चौधरी म्हणाले, की `अशी शस्त्रक्रिया खूपच आव्हानात्मक असते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी लहान साधनांचा वापर करावा लागतो. अंगठ्याच्या कापलेल्या धमन्यांमधील शिरेचा एक भाग अग्रभागापासून कापायचा होता. ही संपूर्ण प्रक्रिया मायक्रोस्कोपद्वारे केली गेली. 6 डॉक्टर्सच्या पथकाने सलग 6 तास शस्त्रक्रिया करून संदीपचा अंगठा जोडण्यात यश मिळवलं.` `माझा अंगठा पुन्हा जोडला जाईल की नाही, याविषयी माझ्या मनात शंका होती. परंतु, डॉक्टरांचा विश्वास आणि मेहनतीमुळं हे शक्य झालं,` असं संदीप कुमारनं सांगितलं. विशेष म्हणजे दुबईत या शस्त्रक्रियेसाठी 24 लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. परंतु, दिल्लीतल्या डॉक्टर्सनी ही शस्त्रक्रिया केवळ 3 लाख 65 हजार रुपयांत केली आणि ती यशस्वीदेखील झाली.
First published:

Tags: Delhi, Dubai, Medical, Surgery

पुढील बातम्या