Home /News /national /

दिल्लीत उपमुख्यमंत्र्याच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला, मनीष सिसोदिया यांनी स्वत: जारी केला CCTV VIDEO

दिल्लीत उपमुख्यमंत्र्याच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला, मनीष सिसोदिया यांनी स्वत: जारी केला CCTV VIDEO

भाजपकडून हे आरोप खोडून काढण्यात आले. मनीष सिसोदिया यांनी हा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. भाजपची प्रतीमा मलिन करण्यासाठी सिसोदिया यांचा हा डाव असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. आम आदमी पक्षचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनी। सिसोदिया यांनी गुरुवारी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि या व्हिडीओवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही अज्ञातांनी मनीष सिसोदिया घरी नसताना त्यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीमध्ये भाजपला निवडणूक जिंकता आली नाही म्हणून अशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवाल देखील त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारला आहे. हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शेअर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि भाजपने त्यावर आपली बाजू स्पष्ट करत सिसोदियांचे आरोप खोडून काढले आहेत. हा व्हिडीओ जुना असून हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत असं देखील भाजपचे महामंत्री हर्ष मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे. हे वाचा-देशभरात डॉक्टरांचा आज संप, कोव्हिड सेंटर सुरू तर 'या' सेवा राहणार बंद नेमकं काय आहे प्रकरण? काही अज्ञातांनी सिसोदिया घरी नसताना गेट तोडून घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. सिसोदिया यांच्या पत्नी आणि मुलांवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांसोबत बाचाबाची करून हे सर्वजण जबरदस्तीनं घरात घुसले. हा व्हिडीओ 12 जुलै 2020 चा असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी ट्वीट करत हे हल्लेखोर भाजप कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला. भाजपकडून हे आरोप खोडून काढण्यात आले. मनीष सिसोदिया यांनी हा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. भाजपची प्रतीमा मलिन करण्यासाठी सिसोदिया यांचा हा डाव असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Delhi

    पुढील बातम्या