आता योगी विरुद्ध केजरीवाल सामना, शिक्षणाच्या मुद्यावर सिसोदीयांनी दिलं चर्चेचं आव्हान

आता योगी विरुद्ध केजरीवाल सामना, शिक्षणाच्या मुद्यावर सिसोदीयांनी दिलं चर्चेचं आव्हान

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) शेजारच्या उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सलग दोन विधानसभा निवडणुका मोठ्या बहुमतानं जिंकल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) शेजारच्या उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केलं आहे. उत्तर प्रदेशात 2022 साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीनंतर राज्यात आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेवर येईल असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया  (Manish Sisodia) यांनी केलाय. शिक्षणाच्या मुद्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याशी खुली चर्चा करण्यास आपण तयार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. सिसोदीया येत्या मंगळवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी लखनौचा दौरा करणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली होती. ‘‘उत्तर प्रदेशात आरोग्य, वीज आणि पाणी या मुलभूत सुविधांची अवस्था अतिशय खराब आहे. राज्यात राजकारणी आणि गुन्हेगार यांची युती आहे’’, असा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्याला उत्तर देताना उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी शाळा आणि हॉस्पिटलचा मुद्दा उपस्थित केला. आता भाजप मंत्र्यांच्या या टिकेला सिसोदीयांनी उत्तर दिलं आहे. “उत्तर प्रदेशात गेल्या 70 वर्षांमध्ये प्रथमच कुणी तरी शिक्षण आणि आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला याचा आनंद आहे,’’ असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

सिसोदीयांचे आरोप

उत्तर प्रदेशातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करतानी सिसोदीयांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘’उत्तर प्रदेशातील अनेक शाळांची अवस्था ही तबेल्यासारखी आहे. 50 हजार शाळांमध्ये फर्निचर नाही. 35 हजार शाळांना भिंत नाही. 60 हजार शाळांमध्ये वीज नाही तसेच हजारो शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी वेगळे शौचालय नाही, असा आरोप सिसोदीयांनी केला आहे.

हे वाचा-लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली सरकारचा दावा

मनिष सिसोदीया यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेचं जोरदार गोडवे गायले. दिल्ली सरकारच्या बजेटमधील 25 टक्के हिस्सा हा शिक्षणासाठी राखून ठेवला असल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षणासाठी इतकी मोठी तरतूद करणारे केजरीवाल सरकार हे पहिलेच सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दिल्लीतील शिक्षकांना फिनलँज, जर्मनी, सिंगापूर, हॉर्वर्ड येथील प्रगत कोचिंग दिले जाते. त्यामुळे दिल्लीतील सरकारी शाळांमधील 98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती सिसोदीया यांनी दिली. या उलट उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये गेल्या चार वर्षांत कोणताही बदल झाला नसल्याचा दावा सिसोदीयांनी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 17, 2020, 1:37 PM IST

ताज्या बातम्या