नवी दिल्ली, 13 मार्च : दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये आज अचानक आग लागल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किट झाल्याने शताब्दी एक्सप्रेसच्या सी-4 बोगीत आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार याबाबत म्हणाले की, ज्या बोगीत आग लागली होती, त्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. (Delhi Dehradun Shatabdi Express catches fire )
सोशल मीडियावर या अपघाताचा एक फोटो व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याबाबत कळताच ते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ही आग खूप भयंकर दिसत आहे. सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. याशिवाय अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे ही वाचा-भरसमुद्रात बोटीवर धगधगत होत्या आगीच्या ज्वाला; पाहा थरारक VIDEO
ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच फायर ब्रिगेड घटनास्थळी हजर झाली. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत ट्रेनला लागलेली आग नियंत्रणात आणली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेनंतर ज्या बोगीत आग लागली होती, ती मुख्य ट्रेनपासून वेगळी करण्यात आली आहे. यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
A fire broke out in the C4 compartment of the Delhi-Dehradun Shatabdi Express today, due to a short circuit. The incident happened near Kansro. All passengers were safely evacuated, no injuries reported: Uttarakhand DGP Ashok Kumar pic.twitter.com/iTIwSkxCWS
दिल्लीहून देहरादूनला जाणारी 02017 अप शताब्दी एक्सप्रेस ट्रेनमध्ये हरिद्वारजवळील कंसरो स्टेशनजवळ आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार आगीने खूप कमी वेळात धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली. ट्रेनच्या सी-4 बोगीच्या खिडक्यांमधून आगीच्या मोठ्या ज्वाला बाहेर येत होत्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना दुपारी 12 वाजल्यानंतर राईवाला आणि कंसरो येथे घडली. इंटरनेटवर ही बातमी पसरताच लोकांची चिंता व्यक्त केली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.