Home /News /national /

Delhi: बारमध्ये असं काही घडलं की इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन मुलीने घेतली उडी

Delhi: बारमध्ये असं काही घडलं की इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन मुलीने घेतली उडी

Girl jumps from fourth floor of bar: एका रेस्ट्रो बारच्या छतावरुन उडी घेत तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर : एका तरुणीने रेस्ट्रो बारच्या छतावरुन उडी घेतल्याची (Girl jumps from forth floor of bar) धक्कादायक घटना दिल्लीतून समोर आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणीने उडी घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही नेपाळची रहिवासी होती जी दिल्लीतील विजय विहार परिसरात आपल्या बहिणीसोबत राहत होती. (Girl jumps from bar terrace in Delhi) बार मालकावर गंभीर आरोप रिपोर्ट्सनुसार, शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. पीडित परिवाराचा आरोप आहे की, बारच्या मालकाने आमच्या मुलीला बार डान्सर बनण्यासाठी दबाव टाकत होता. याच वादातून आमच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. वाचा : महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना पोलीस तपास सुरू या घटनेप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. दिल्लीतील या रेस्ट्रो-बारचं सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. रेस्ट्रो बारमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. यासोबतच बारचे मालक आणि इतर स्टाफ यांचीही चौकशी करत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर त्या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत. मृतक मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी बार मालकावर अनेक आरोप केले आहेत. घटनेच्या दिवशी कार्यक्रम संपल्यानंतरही बार मालकाने तिला रोखले आणि चुकीचं काम करुन घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळेच आमच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असाही आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा : अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड मृतक मुलीचं वय 21 वर्षे असून ती आपल्या बहिणीसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, तिचं पार्टी ऑर्गनायझरसोबत भांडणही झालं होतं. पोलिसांनी मृतक मुलीच्या बहिणीचाही जबाब नोंदवला आहे. तिच्या बहिणीने सांगितले की, माझी बहीण राखी हिने खूप मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती मात्र, एका व्यक्तीमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी बारमध्ये उपस्थित असलेले नागरिक आणि बारमधील स्टाफ या सर्वांची यादी बनवण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पार्टी ऑर्गनायझर याचीही चौकशी केली जाणार आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Delhi, Suicide

    पुढील बातम्या