भारत सरकारला एक हजार कोटींचा चुना, फोन कॉलवरून केली फसवणूक

भारत सरकारला एक हजार कोटींचा चुना, फोन कॉलवरून केली फसवणूक

दिल्लीतील सायबर सेलने एका असा फसवणुकीचा खुलासा केला आहे ज्यामुळे सरकारला तब्बल एक हजार कोटींचा तोटा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : दिल्लीतील सायबर सेलने एका असा फसवणुकीचा खुलासा केला आहे ज्यामुळे सरकारला तब्बल एक हजार कोटींचा तोटा झाला आहे. एवढंच नाही तर हा हॅकर कॅनडातील लोकांना पोलिस कारवाईची भीती धालून त्यांच्याकडून बिटकॉइनची रक्कम हडप करत होता. पोलिसांनी या प्रकरणी 32 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीतील सायबर सेलच्या चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी)च्या माध्यमातून फोन करत होते. कॉल करण्यासाठी ते कॅनडातील नंबरचा वापर करत होते. यासाठीची सुविधा वापरण्यासाठी सरकारकडून लायसन घेण्याची गरज असते. या लायसनसाठी मोठी फी द्यावी लागते. मात्र या सायबर गुन्हेगाराने कोणत्याही परवानगीशिवाय याचा वापर केला.

टेलिकॉम विभागाच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली. यात आरोपींनी व्हीओआयपी कॉलच्या प्रक्रियेत नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं. या आरोपींनी आंतरराष्ट्रीय बाजारातून अनधिकृत व्हीओआयपी खरेदी केले होते. यामुळे भारत सरकारला जवळपास 1 हजार कोटींचं नुकसान झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सायबर सेलच्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत आरोपींकडून मूळच्या कॅनडातील पाचशेहून अधिक लोकांना लुटण्यात आलं. आरोपी आपण कॅनडाचे पोलिस असल्याचे सांगायचे आणि तिथल्या नागरिकांशी बोलायचे. तसेच त्यांनी भीती घालायचे की, सिन नंबरचा वापर करून इतर अवैध कामे झाली आहेत त्यावरून दहशतवाद्यांना पैसे ट्रान्सफर झाले आहेत. असं सांगितल्यानंतर तडजोड करत बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे उकळले जात होते.

याबाबत कॅनडातील रहिवाशी एल्विस हेन्री याने फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आणि दूरसंचार विभागाच्या पथकाने एका ठिकाणी धाड टाकली. यात एका कॉल सेंटरमधून हे सर्व उद्योग सुरू होते. या ठिकाणी एका व्यवस्थापकासह 32 जण काम करत होते. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून सेंटर चालवणारे पाचजण फरार आहेत. या ठिकाणाहून 55 कॉम्प्युटर, 35 मोबाइलसह कम्युनिकेशन सॉफ्टवेअर व्हीओआयपी कॉलिंग डायलर जप्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi
First Published: Nov 19, 2019 08:28 AM IST

ताज्या बातम्या