Home /News /national /

FB वर भेटलेल्या Boyfriend च्या मदतीनं काढला पतीचा काटा, असा झाला हत्येचा खुलासा

FB वर भेटलेल्या Boyfriend च्या मदतीनं काढला पतीचा काटा, असा झाला हत्येचा खुलासा

कुरेशींच्या हत्येत बाहेरच्या व्यक्तीचा सहभाग नव्हता, तर केवळ पत्नीचा, जिच्याशी त्यांनी 25 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. ही घटना 17 मे रोजीची आहे.

    नवी दिल्ली, 27 मे: दिल्लीतील (Delhi) दर्यागंज भागात (Daryaganj Area) वर्कशॉप मालक मोइनुद्दीन कुरेशी (Moinuddin Qureshi)यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. कुरेशींच्या हत्येत बाहेरच्या व्यक्तीचा सहभाग नव्हता, तर केवळ पत्नीचा, जिच्याशी त्यांनी 25 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. ही घटना 17 मे रोजीची आहे. हा खून कुरेशीच्या पत्नीने प्रियकरासह केला होता. दोघांनी सहा लाख रुपयांची सुपारी देऊन भाड्यानं मारेकऱ्याला गाझियाबादहून बोलावलं होतं. मृताच्या पत्नीच्या मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून (सीडीआर) पोलिसांना मोठी माहिती मिळाली आणि बुधवारी तीन आरोपींना अटक केली. चार महिन्यात 1900 मुलं गायब, पोलिसांना सापडली केवळ इतकीच मुलं  पोलिसांनी मोईनुद्दीन कुरेशीची 40 वर्षीय पत्नी जीबा कुरेशी, तिचा 29 वर्षीय प्रियकर शोएब आणि भाड्याचा मारेकरी विनीत गोस्वामी या तिघांना अटक केली आहे. गोस्वामी हा गाझियाबादमधील बाम्हेटा गावचे रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतुसे, तीन लाख रुपये किंमतीची सुपारी आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, 17 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी कालिदास रोडवरील खालसा शाळेसमोर वर्कशॉप मालक मोईनुद्दीन यांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी मोईनुद्दीनचा धाकटा भाऊ रुकनुद्दीन याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डवरून उघड झाले रहस्य तपासादरम्यान पोलिसांनी मृताच्या पत्नीचे जबाब घेतले असता, त्यात बराच विरोधाभास दिसून आला. ती वारंवार विधान बदलत होती. यावर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर शोधला. यादरम्यान जीबा मेरठमधील एका नंबरवर सतत बोलत असल्याचे पोलिसांना समजले. याबाबत पोलिसांनी तिची पुन्हा चौकशी केली असता तिने नकार दिला. मात्र तिची कडक चौकशी केल्यानंतर तिने हत्येचा कट उघड केला. यानंतर पोलिसांनी बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणांहून एक एक करून तिन्ही आरोपींना अटक केली. फेसबुकच्या माध्यमातून प्रियकराशी मैत्री चौकशीदरम्यान पत्नी जिबानं खुलासा केला की, 25 वर्षांपूर्वी वयाच्या 15 व्या वर्षी मोईनुद्दीनसोबत तिचा विवाह झाला होता. जिबाला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. दुसरीकडे, मोईनुद्दीनचा वर्कशॉपशिवाय प्रॉपर्टीचा व्यवसाय होता. तो आपला बहुतेक वेळ पतंग उडवण्यात आणि दारू पिण्यात घालवायचा. एवढंच नाही तर दारूच्या नशेत मारहाण ही करायचा. दलिताच्या वरातीत गोंधळ, 40 जणांकडून दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला  दरम्यान, त्रासलेल्या जिबाने मेरठमध्ये राहणाऱ्या शोएबशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की जीबाने शोएबशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने शोएबसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. पोलीस आरोपींकडून अधिक माहिती गोळा करत आहेत. चोरीच्या बाईकवरून आले होते मारेकरी तपासात सहभागी असलेल्या पोलीस पथकाने सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. याशिवाय सुमारे 100 जणांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान मोईनुद्दीनची हत्या करणारा आरोपी यूपीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आरोपींनी हा गुन्हा केला होता. दर्यागंज परिसरातील तारा हॉटेलजवळ ही दुचाकी बेवारस स्थितीत सापडली. मेरठच्या मेडिकल कॉलेज पोलीस स्टेशन परिसरातून ही बाईक चोरीला गेली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Delhi, Delhi News, Murder

    पुढील बातम्या