मराठी बातम्या /बातम्या /देश /Delhi Crime News: धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या

Delhi Crime News: धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या

Delhi Crime: देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतून धक्कादायक क्राइमची एक घटना समोर येते आहे. माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची याठिकाणी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

Delhi Crime: देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतून धक्कादायक क्राइमची एक घटना समोर येते आहे. माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची याठिकाणी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

Delhi Crime: देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतून धक्कादायक क्राइमची एक घटना समोर येते आहे. माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची याठिकाणी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 07 जुलै: देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतून अपराधाची  (Delhi Crime News) धक्कादायक घटना समोर येते आहे. याठिकाणी माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची निघृण हत्या करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पीआर कुमारमंगलम (Late Former Union Minister P Rangarajan Kumaramangalam) यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम (Kitty Kumaramangalam Murder) यांची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आली आहे.

दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही भयंकर घटना घडली आहे. किट्टी कुमारमंगलम दिल्लीतील वसंत विहार परिसरात वास्तव्यास होत्या. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांड प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आलं असून अन्य दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. अद्याप हत्येचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. दिल्लीतील हत्येच्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

हे वाचा-मुंबईत दुचाकीस्वाराची गुंडगिरी; स्वत:ची चूक असतानाही बस चालकाला केली बेदम मारहाण

काही मीडिया अहवालांनी दिल्ली पोलिसांच्या हवाल्यानं अशी माहिती दिली आहे की, 67 वर्षीय किट्टी कुमारमंगलम यांची हत्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या भामट्यांनी केली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा मृत्यू कॅन्सरने झाला होता. त्यांच्या पत्नीची अशाप्रकारे हत्या होणं सर्वांसाठी धक्कादायक आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताकडून घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे वाचा-सामान्यांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

नेमकं काय घडलं?

मीडिया अहवालांच्या मते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या एका महिलेनं दार उघडलं, तेव्हा धोबी आला होता. त्याने तिला बळजबरीने बाजूच्या खोलीत बांधून ठेवलं. त्यानंतर आणखी दोघजणं आली ज्यांनी उशीचा वापर करून किट्टी यांचं तोंड दाबलं आणि त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती साधारण 11 च्या सुमारास मिळाली. मोलकरणीनं कसंबसं स्वत:ला सोडवून आरडाओरड केली त्यावेळी त्यावेळी घडलाप्रकार समोर आला होता. मोलकरणीच्या जबाबानंतर वसंत विहार परिसरातच राहणाऱ्या त्या राजू नावाच्या धोब्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर इतर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Delhi, Delhi capitals, Murder, Murder news