फक्त आता घरी जाऊदे पुन्हा येणारच नाही; लॉकडाऊनमुळे स्वप्नांची झाली राखरांगोळी

फक्त आता घरी जाऊदे पुन्हा येणारच नाही; लॉकडाऊनमुळे स्वप्नांची झाली राखरांगोळी

चहा विकून रोज दुप्पट पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. पण कोरोनामुळे दिल्लीत व्यवसाय बंद पडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : कोरोना व्हायरसनं देशभरात धुमाकूळ घातला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आधीच 38 दिवस लॉकडाऊनमुळे व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामध्येच दिवसाला दुप्पट आपल्या प्रसिद्ध चहातून पैसे कमवणाऱ्या महिलेचा व्यवसायही ठप्प झाला. हातात पैसे होते तोपर्यंत उदरनिर्वाह करणं शक्य होतं. पण पैसे संपले आणि समोर समस्यांचा मोठा डोंगर उभा राहिला. तिनं डोळ्यात पाहिलेली सगळी स्वप्न मातीमोल झाली आहेत. पैसे नसल्यानं सगळं सोडून आता कामगारांसाठी सोय केलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये राहण्याची वेळ महिलेसह कुटुंबावर आली आहे. 38 दिवसांमध्ये हातातील पैसेही संपल्यानं पदरात फक्त निराशा आली.

बिहारच्या एका छोट्याशा गावातून खूप स्वप्न उराशी बाळगून आलेली ही महिला चहा विकून रोज दुप्पट पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. पण कोरोनामुळे दिल्लीत व्यवसाय बंद पडला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. गावाची आठवण येऊ लागली. पाहिलेली सगळी स्वप्न तुटली आणि पदरात फक्त भुक भागवणं एवढीच एक अपेक्षा उरली. दिवस रेटत होती. हातातील पैसे संपल्यावर जगायचं कसं हा प्रश्न होताच.

हे वाचा-भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार आशा देवी या बिहारची रहिवासी आहेत. त्यांचा मोठा परिवार आहे. एक भाऊ, दोन मुली, 6 मुलं आणि एक गर्भवती बहिण असा यांचा परिवार आहे. हे सर्वजण प्रवासी कामगारांसाठी करण्यात आलेल्या सरकारकडून शेल्टरमध्ये राहात आहेत. एकदा आम्हाला आमच्या घरी जाऊद्या. पुन्हा दिल्लीत येणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे आलेल्या परिस्थितीमुळे आशा देवी यांनी आपली स्वप्न मागे ठेऊन दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतून बिहारला जाण्याची सोय करण्यात यावी यासाठी सरकारकडे मागणी करत आहेत.

हे वाचा-श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी रेल्वेनं जारी केले निर्देश, फक्त हेच लोक करणार प्रवास

दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 हजाराहून अधिक आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इथे जवळपास 40 लाख कामगार, प्रवासी असे आहेत जे आपल्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिल्ली सरकारनं कामगारांच्या खाण्या-पिण्याची सोय केली आहे. आता दिल्ली सरकारकडून त्यांच्यासाठी गाड्या सोडणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काहीसा दिलासा व्यक्त केला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 2, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या