मराठी बातम्या /बातम्या /देश /

केजरीवालांना कोरोना होताच मोठा निर्णय; दिल्लीत Weekend curfew, हा निर्णय घेणारं देशातील पहिले राज्य

केजरीवालांना कोरोना होताच मोठा निर्णय; दिल्लीत Weekend curfew, हा निर्णय घेणारं देशातील पहिले राज्य

Delhi Weekend Curfew

Delhi Weekend Curfew

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा (Delhi Weekend Curfew) करण्यात आली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 4 जानेवारी: कोरोनाने (Corona) जगभरात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा (Delhi Weekend Curfew) करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणं जाणवत असून घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगानं वाढणारे कोरोनाचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्हिटी रेट वेगानं वाढत आहे.

दिल्लीत वेगाने करोनाचा संसर्ग फैलावत असून चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत करोनाचे 4099 रुग्ण आढळले होते. दिल्लीतील वाढत्या करोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी 11 वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आय़ोजित करण्यात आली. या बैठकीत करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

First published:

Tags: Arvind kejriwal, Corona, Delhi