पी. चिदंबरम तुरुंगातून थेट संसदेत, काँग्रेसचं कांद्याच्या दरवाढीविरोधात आंदोलन

पी. चिदंबरम तुरुंगातून थेट संसदेत, काँग्रेसचं कांद्याच्या दरवाढीविरोधात आंदोलन

कांदा दरवाढीच्या झळा दिल्लीत, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर: अब की बार कांदा 150 पार असे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यानं सर्वसामान्यांचा खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. प्रत्येक भाजी आणि हॉटेल्समध्ये वापरला जाणारा कांदा आता खिशाला परवडत नसल्यानं बंद करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत असल्यानं व्यापाऱ्यांची चांदी तर सर्व सामान्यांच्या घरात मंदी अशी अवस्था निर्माण झाली आहे. कांद्याचे भाव गगनला भिडल्यानं त्याविरोधात दिल्लीत संसदभवनाबाहेर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात पी. चिदंबरम यांनीही सहभाग घेतला होता. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे ही अवस्था झाली असल्याचं पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था चुकीच्या हातांमध्ये असल्याचा हल्लाबोल पी. चिदंबरम यांनी केला आहे. महागाई, कांद्याची दरवाढ, घसरलेली अर्थव्यवस्था या सगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसने गुरुवारी संसदभवन परिसरात जोरदार प्रदर्शन केलं. कांद्याच्या किमती वाढल्यानं गृहिणींचं घरगुती बजेट कोलमडलं आहे. तर अनेक ठिकाणी कांद्याची पोती चोरीला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. मोदी सरकार गप्प का आहे असे सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर काँग्रेसच्या खासदारांची संसदभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

महाराष्ट्रात काय आहे कांद्याबाबत स्थिती

कांद्याची दरवाढ सुरूच आहे. लासलगाव बाजारसमितीमध्ये कांद्याला प्रतिक्विटंल बाजार समित्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 7 हजार 273 रुपये इतका भाव मिळालाय. मनमाड बाजारसमितीत कमीत कमी दीड हजार, जास्तीत जास्त 6 हजार 800 रुपये तर सरासरी 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही जवळपास हाच भाव मिळत आहे.

पुणे बाजारसमितीमध्ये साडे सहा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. उन्हाळा कांद्याला 45 ते 130 रूपये किलोचा भाव तर नवीन लाल कांद्यांला 30 रूपये ते 100 रूपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: December 5, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading