राहुल गांधींच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचा विरोध; 'या' निर्णयाला दर्शवली असहमती

राहुल गांधींच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचा विरोध; 'या' निर्णयाला दर्शवली असहमती

दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी राहुल गांधी आग्रही असले तरी काँग्रेस नेत्यांनी मात्र त्याला नकार दर्शवला आहे. त्यामुळे राहुल गांधी ही सारी परिस्थिती कशी हाताळतात हे पाहावं लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च : लोकसभा निवडणुकीकरता भाजपविरोधात विरोधकांची महाआघाडी उभी राहत आहे. देशातील प्रमुख पक्ष एकत्र येत भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. या महाआघाडीमध्ये आम आदमी पक्षाला देखील सामावून घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तयारी दर्शवली आहे. पण, राहुल गांधी यांच्या निर्णयाला आता दिल्लीतील नेत्यांनी विरोध केला आहे. दिल्लीमध्ये लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असून 'आप'ची गरज नाही.असं काँग्रेस नेत्याचं मत आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय घेत काँग्रेसच्या नेत्यांनी निर्णय घेत राहुल गांधी यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरी देखील 'आप'ला महाआघाडीमध्ये घेण्यासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी हिरवा कंदिल दर्शवला होता. पण, काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे आता राहुल गांधी काय निर्णय घेतात? हे पाहावं लागणार आहे.

बैठकीत होणार निर्णय

'आप'सोबत आघाडी करायची की नाही याबाबत आज निर्णय होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. नेत्यांच्या विरोधानंतर देखील राहुल गांधी काय निर्णय घेतात. हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, 'आप'नं 2 मार्च रोजी दिल्लीतील सात जागांवरती आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्यानं 'आप'नं नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द केली.

'आप'चे ते सात उमेदवार कोण?

आम आदमी पक्षानं पूर्वी दिल्लीतून आतिश मार्लेना, दक्षिण दिल्लीतून राघव चड्डा, चांदनी चौकातून पंकज गुप्ता, उत्तर पूर्व दिल्लीतून दिलीप पांडे, उत्तर पश्चिम दिल्लीतून गगन सिंह आणि नवी दिल्लीतून बृजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे.

माता न तू वैरिणी... हा VIDEO पाहिल्यावर तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही

First published: March 5, 2019, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading