दिल्लीमध्ये ‘आप’शी युती नाही, शीला दीक्षित यांनी केलं जाहीर

दिल्लीमधल्या लोकसभेच्या सात जागांपैकी तीन जागांसाठी काँग्रेस आणि आपने वाटाघाटी करून पाहिल्या पण या चर्चेला यश आलेलं दिसत नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची युती होणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांनी जाहीर केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 05:25 PM IST

दिल्लीमध्ये ‘आप’शी युती नाही, शीला दीक्षित यांनी केलं जाहीर

नवी दिल्ली, 5 मार्च : दिल्लीमधल्या लोकसभेच्या सात जागांपैकी तीन जागांसाठी काँग्रेस आणि आपने वाटाघाटी करून पाहिल्या पण या चर्चेला यश आलेलं दिसत नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीशी युती होणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांनी जाहीर केलं.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. आपशी युती करण्याच्या शक्यता पडताळून पाहावी, असा या बैठकीचा उद्देश होता.


काँग्रेसने आपबरोबर आघाडीची शक्यता फेटाळून लावल्यानंतर काही तासांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मात्र ही आघाडी झाली नाही, यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचा याबाबतीत भाजपशी छुपा समझोता झाला असल्याचा त्यांनी दावा केला.

आम आदमी पार्टीने कालच दिल्लीतल्या सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यातल्या ३ उमेदवारांमध्ये जिंकण्याची क्षमता असल्याची चर्चा आहे.

Loading...

पुलवामा हल्ला आणि भारताचा हवाई हल्ला यानंतर देशभरातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळेच ही चर्चा झाली, असं बोललं जातं. युती झाली नसली तरी दिल्लीतल्या एका जागेसाठी आप आणि काँग्रेस एकच उमेदवार देतील, अशी शक्यता आहे.

या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावांची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने युती करावी, असा आग्रह आम आदमी पार्टीने  धरला होता. पण काँग्रेसकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. काँग्रेसचा पाठपुरावा करून मी थकून गेलो आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती झाली तर दिल्लीमध्ये भाजपचा सपशेल पराभव होईल पण काँग्रेस यासाठी का तयार नाही हे कळत नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू हे दिल्लीतल्या या युतीसाठी प्रयत्न करत होते. चंद्राबाबू नायडू यांनी याबद्दल काँग्रेस नेतृत्वाशी चर्चाही केली होती. पण त्याला यश आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...