Home /News /national /

10 रुपयांचं आमिष दाखवून 7 वर्षीय बालिकेवर नराधमाचा Rape; बालिकेची गंभीर अवस्था

10 रुपयांचं आमिष दाखवून 7 वर्षीय बालिकेवर नराधमाचा Rape; बालिकेची गंभीर अवस्था

घटनेनंतर मुलीचे वडील तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले पण तिचा रक्तस्त्राव तिथे थांबला नाही. त्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, जिथं सध्या ही मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

    नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : एका व्यक्तीने सात वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर (Rape on minor) 10 रुपयांचे आमिष दाखवून सोबत नेत तिच्यावर बलात्कार (Rape case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना राजधानीत दिल्लीत रणजीत नगर परिसरात घडली आहे. आयोगाकडून सांगण्यात आलं की, 22 ऑक्टोबर रोजी आयोगाला दिल्लीच्या रणजीतनगर भागात एका मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 वर्षांच्या मुलीला एका माणसाने 10 रुपयांची नोट दाखवून बोलावले आणि नंतर तिला घेऊन तिच्यावर निर्दयीपणे बलात्कार केला. घटनेनंतर मुलीचे वडील तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले पण तिचा रक्तस्त्राव तिथे थांबला नाही. त्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, जिथं सध्या ही मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. हे वाचा - Running Benefits : जास्त अंतर धावायचं की वेगानं धावायचं? यातलं काय असतं अधिक फायद्याचं? या प्रकरणाची दखल घेत महिला आयोगाचे एक पथक त्या मुलीकडे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना नोटीस पाठवून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. आयोगाने पोलिसांकडून या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरचा तपशील मागितला आहे. यासोबतच आरोपींच्या अटकेची माहिती मागवण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस काय पावले उचलत आहेत, अशी विचारणा आयोगाने केली आहे. दिल्ली महिला आयोगानं दिल्ली पोलिसांना या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. हे वाचा - Shocking : डेटिंग App वर श्रीमंत माणूस शोधत होती मुलगी, समोर आले स्वतःचेच वडील या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, 'या घटनेमुळं मला खूप दुःख झालं आहे. लहान मुलींवरील बलात्काराच्या घटना वारंवार आपल्यासमोर येत आहेत, ही अत्यंत चिंतेची आणि शरमेची बाब आहे. लहान मुलींवरील बलात्काराच्या घटना रोखू न शकलेल्या या यंत्रणेचे अपयश आहे. हा मुद्दा आम्ही यापूर्वी अनेकदा मांडला आहे, मात्र अशा दुर्दैवी घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. खूप कठोर पावले उचलूनच मुलींवरील बलात्काराच्या घटना थांबवता येतील. आमची टीम सतत पीडित आणि तिच्या कुटुंबासोबत आहे आणि आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहोत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तातडीने कारवाई करावी, आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rape case, Rape on minor

    पुढील बातम्या