मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेले विपश्यनेला; 10 दिवस ना TV, ना NEWSPAPER

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेले विपश्यनेला; 10 दिवस ना TV, ना NEWSPAPER

arvind kejriwal

arvind kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) रविवारपासून 10 दिवसांच्या (10 days) विपश्यना (Vipashyana) शिबिराला गेले आहेत.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) रविवारपासून 10 दिवसांच्या (10 days) विपश्यना (Vipashyana) शिबिराला गेले आहेत. पुढचे 10 दिवस केजरीवाल हे कुणाच्याही संपर्कात नसतील. ते टीव्ही (TV) आणि वर्तमानपत्रं (Newspapers) यांच्यापासूनही दूर राहतील, असं सांगण्यात आलं आहे. यापूर्वीदेखील अनेकदा केजरीवाल हे विपश्यनेसाठी गेले आहेत.

केजरीवाल आणि विपश्यना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजकारण येण्यापूर्वीपासूनच विपश्यना करत आहेत. वर्षातून किमान 2 वेळा ते विपश्यनेला जात असतात. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारानंतरदेखील ते विपश्यनेला गेले होते. महाराष्ट्रातील इगतपुरी, हिमाचल प्रदेशातील धर्मकोट यासह देशातील अनेक विपश्यना केंद्रांवर जाऊन त्यांनी विपश्यना केली आहे. विपश्यनेच्या या 10 दिवसांच्या कालावधीत केजरीवाल यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क असणार नाही. दिल्लीतील आणि देशातील कुठल्याही घडामोडी त्यांना समजू शकणार नाहीत. त्यांच्याकडे ना टीव्ही असेल, ना मोबाईल.

हे वाचा - प्रेम एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी, BF च्या घरासमोरच प्रेयसीनं घेतल पेटवून

विपश्यना म्हणजे काय?

विपश्यना ही एक पुरातन ध्यान पद्धती आहे. एखादी गोष्ट पाहून परत येणे, म्हणजे विपश्यना. यात सुरुवातीला श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं जातं. त्यानंतर शांतपणे शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करण्यात येतं. आत्मशुद्धी आणि आत्मनिरीक्षणाची एक सर्वोत्तम पद्धत म्हणून विपश्यनेकडे पाहिलं जातं. गौतम बुद्धांनादेखील ज्या प्रकारच्या ध्यानातून सिद्धी प्राप्त झाली, तो प्रकार विपश्यनेचाच होता, असं मानलं जातं. मन शांत करणे, शरीर आणि मनावरील तणाव कमी करणे यासाठी विपश्यना करण्यात येते. सततच्या धावपळीमुळे येणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेकजण विपश्यनेला जात असतात. विपश्यनेचं महत्त्व लक्षात आलेले नागरिक सातत्याने ही विपश्यना करण्यासाठी हजेरी लावतात.

First published:

Tags: Arvind kejriwal, Delhi