Home /News /national /

Delhi News: अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागणी, मुख्यमंत्री देखील क्वारंटाइन

Delhi News: अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागणी, मुख्यमंत्री देखील क्वारंटाइन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं केजरीवाल स्वतः देखिल क्वारंटाईन झाले आहेत. तरीही सर्व कामं सुरळीत सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    नवी दिल्‍ली, 20 एप्रिल : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांना देखील कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. सुनिता केजरीवाल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal in quarantine) यांनी देखील स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोज जवळपास 20 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची याठिकाणी नोंद होत आहे. सोमवारी याठिकाणी 23,500 तर रविवारी 25,500 रुग्ण आढळले होते. कोरोना संक्रमणाचा दर याठिकाणी प्रचंड वाढलेला असून 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. यातच आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं केजरीवाल स्वतः देखिल क्वारंटाईन झाले आहेत. तरीही सर्व कामं सुरळीत सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (हे वाचा - पश्चिम महाराष्ट्राने चिंता वाढवली,राज्यातील कोरोना मृत्यूदर कोल्हापुरात सर्वाधिक) अरविंद केजरीवाल यांनी सोमवारीच राज्यात सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दिल्लीमध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं बेडची संख्या दिवसेंदिवस घटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आता या लॉकडाऊनच्या काळात बेड वाढवणं, ऑक्सिजन आणि औषधी यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (हे वाचा-Maharashtra Lockdown Update: सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार किराणाची दुकानं) दिल्लीत सध्या कोरोनाची चौथी लाट असल्याच केजरीवाल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी तिसऱ्या लाटेत 8 हजार रुग्ण रोज आढळत होते. आता तो आकडा तीनपट झाला आहे. त्यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. पण तरीही यंत्रणा कोलमडली नसून नागरिकांसाठी सर्व व्यवस्था करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Coronavirus, Delhi

    पुढील बातम्या