अरविंद केजरीवाल यांना कोरोना नाही; COVID चाचणी आली निगेटिव्ह

अरविंद केजरीवाल यांना कोरोना नाही; COVID चाचणी आली निगेटिव्ह

गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि खोकला असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. त्यांची सकाळी COVID-19 चाचणी करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जून : गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. त्यांची सकाळी COVID-19 चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आता आला असून केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने कोरोना चाचणी झाली होती.

दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्त्यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माध्यम केंद्र आगामी 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसात Coronavirus ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णांना सामावून घ्यायला पुरेशी रुग्णालयं आहेत का असा प्रश्न निर्माण झाल्यावर केजरीवालांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दिल्लीकरांना प्राधान्याने उपचार मिळतील. परप्रांतीयांनी दिल्लीत उपचारासाठी येऊ नये असा आदेश काढला. त्यावरून मोठा वादंग उठला होता. अखेर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरावाल यांना हा आदेश मागे घ्यायला लावला.

पाहा 'मदत हवीये..' दिल्लीतली परिस्थिती दाखवणारा VIDEO राहुल गांधीनी केला शेअर

दरम्यान, गेल्या 25 मे रोजी भारत करोनारुग्णांच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये पोहोचला आणि आता अवघ्या तेरा दिवसांत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुदैवाने भारतात रुग्णांच्या आकड्याच्या तुलनेत मृत्यूदर खूप कमी आहे. जगातील अत्यल्प मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये सध्या भारताचा समावेश होत आहे, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली आहे. जगभरात करोनामुळे आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक रुग्ण मृत्यमुखी पडले असताना भारतात मृतांची संख्या 7 हजाराच्या घरात पोहोचली आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी या लॉकडाउनचा अवलंब करणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतात एक लाखामागे करोनारुग्णांची संख्या 17.23 इतकी, तर मृतांची संख्या एक लाखामागे 0.49 इतकी आहे.

अन्य बातम्या

कोरोनाविरोधी भारतीयांना मिळाली ताकद; 30% संक्रमित उपचारविनाच बरे झाले?

गर्दीतही ओळखणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलं खास उपकरण

पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात चक्र फिरलं; रुग्णालयाजवळ आढळले पतीचे शव

First published: June 9, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या