मोठी बातमी! कोरोनाच्या संकटात ‘या’ राज्याने 8.36 रुपयांनी स्वस्त केल्या डिझेलच्या किंमती

मोठी बातमी! कोरोनाच्या संकटात ‘या’ राज्याने 8.36 रुपयांनी स्वस्त केल्या डिझेलच्या किंमती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (CM Arvind Kejriwal) गुरुवारी पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या. यात केजरीवाल यांनी डिझेलवरील 16% व्हॅट (VAT) कमी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (CM Arvind Kejriwal) गुरुवारी पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या. यावेळी केजरीवाल यांनी डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी डिझेलवरील 16% व्हॅट (VAT) कमी केला आहे. यामुळे आता दिल्लीत डिझेल 8.36 पैसे प्रति लीटर स्वस्त होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की हळूहळू लोक आता कामावर परतत आहेत. नोकरी शोधणार्याॅ आणि घेणार्यांरसाठी आम्ही नोकरी पोर्टल तयार केले आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी केजरीवाल यांनी, दिल्लीतील सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी एकत्र यावे आणि दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी हातभार लावा असे आवाहन केले. येत्या काही काळात व्यावसायिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आरटी-पीसीआर चाचणी

तर, अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांना नवीन सूचना जारी केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की कोणत्याही रूग्णाची अॅंन्टीजेन चाचणी निगेटिव्ह असेल मात्र त्या रुग्णांत लक्षणं असतील तर आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी. दिल्ली आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार 1 आठवड्यापूर्वी एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 509 होती आणि 1 लाख 06 हजार 118 रुग्ण बरे झाले. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 30, 2020, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading