Home /News /national /

देशाच्या राजधानीत 24 तास विजेनंतर आता 24 तास पाणी! वाचा काय आहे केजरीवाल सरकारचा निर्णय

देशाच्या राजधानीत 24 तास विजेनंतर आता 24 तास पाणी! वाचा काय आहे केजरीवाल सरकारचा निर्णय

कोरोना काळात दिल्लीवासियांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

    नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 तास विजेसोबतच आता पाणीही मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्ली आता जेवढं पाणी उपलब्ध आहे त्यातलं प्रतिदिन 176 लीटर पाणी प्रत्येक दिल्लीतल्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारचा निर्णय आहे. यासाठी त्यांनी नियोजनही केलं आहे. कोरोना काळात दिल्लीवासीना पाणी 24 तास पाणी मिळणार असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. हे वाचा-'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', शास्त्रज्ञांचा दावा दिल्लीत दोन कोटी नागरिकांची संख्या आहे. त्यांच्यासाठी पुरेसं पाणीही उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. या पाण्याचा योग्य वापर आणि निचरा होत नाही. हे पाणी नेमकं कुठे जातं? पाण्याची चोरी होते का? अथवा पाणी गळून अथवा वाहून वाया जात आहे का? या सगळ्याचा मागोवा घेऊन त्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं जात नाही. या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सल्लागार नेमण्याचं ठरवलं आहे. त्याद्वारे पाण्याचं नियोजन आणि योग्य सल्ला घेतला जाईल आणि त्यानुसार पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून प्रत्येक दिल्लीतील नागरिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा सरकारचं लक्ष्य असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Coronavirus, Delhi

    पुढील बातम्या