मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी, 'CMO'ला अज्ञाताकडून ई-मेल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाला 9 जानेवारीला एक अज्ञात मेल आला होता. हा मेल मिळताच याबद्दल पोलिसांना सांगण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2019 07:34 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी, 'CMO'ला अज्ञाताकडून ई-मेल

नवी दिल्ली, 13 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाला अज्ञाताकडून मेल करण्यात आला आहे. या मेलमध्ये केजरीवाल यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाला 9 जानेवारीला एक अज्ञात मेल आला होता. हा मेल मिळताच याबद्दल पोलिसांना सांगण्यात आलं. त्याची मेलची एक प्रत पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना देण्यात आली आहे.

उत्तरी दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी तिला पोलीस संरक्षण देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिच्यासोबत एक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आला आहे.

सध्या पोलीस आलेल्या मेलची तपासणी करत आहेत. तो एक सायबर कॅफेमधून पाठवला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ज्या मेल आयडीवर हा मेल आला त्याचा आता पोलीस तपास करत आहेत.

'दिल्ली सरकार धमकी देणार मेल आम्ही पोलिसांना पाठवला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत.' असं एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Loading...


Special Report : मनसेच्या 'इंजिना'ला पवारांचं 'इंधन'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 07:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...