16 मार्च : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्यावर असलेलं मानहानी प्रकरण संपवण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसतयं. कारण त्यांच्या या प्रकरणासंबंधी त्यांनी माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे. यासंबंधी लेखीत स्वरुपात माफिनामा देऊन ते लवकरच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
गतवर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी विक्रम मजिठिया यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी मजिठिया यांना ड्र्ग्ज माफिया असं म्हटलं होतं. आणि म्हणून मजिठिया यांनी केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता.
आता या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांच्यावतीने माफीनाम्याचे पत्र जमा करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Delhi, अरविंद केजरीवाल, अरुण जेटली