नवी दिल्ली, 6 मार्च: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आता दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेबाबत नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई (CBSE/ICSE) बोर्डच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिकवलं जात होत. पण आता दिल्लीचं सुद्धा स्वतःच स्वतंत्र शिक्षण बोर्ड असणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एजुकेशन' ची स्थापना केली जाईल आणि हे बोर्ड दिल्लीच्या शिक्षण पद्धतीत होणाऱ्या क्रांतिकारी बदलाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.’
मंत्रिमंडळाची मान्यता -
दिल्लीत स्वत:चं शिक्षण मंडळ तयार करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यताही मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, आज मी जी घोषणा करणार आहे त्याने फक्त दिल्लीच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरदेखील खूप जास्त परिणाम दिसून येणार आहे. येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये काही शाळा नवीन बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवणार आहेत. महत्वाचं म्हणजे बाकी राज्यांचे स्वतःचे बोर्ड आहेत आणि या राज्यांमध्ये सर्व परीक्षा या बोर्डाअंतर्गतचं घेतल्या जातात. त्याचप्रमाणे आता दिल्ली सरकारनेही स्वत:चं बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
(वाचा - Gold Racket Case: 'मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही मिळाला पुरावा', NIA ने केला महत्त्वाचा खुलासा)
दिल्ली बोर्डच्या बाबतीत केजरीवाल यांनी सांगितलेल्या खास गोष्टी -
1) दिल्ली स्कूल ऑफ एज्युकेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं बोर्ड असेल.
2) दिल्ली शालेय शिक्षण मंडळामध्ये यावर्षी 20 ते 25 सरकारी शाळांचा समावेश असेल.
3) दिल्लीतील सरकारी शाळांवर पालकांचा विश्वास आहे. सरकारी शाळेतील मुलं वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षांमध्ये चांगलं यश मिळवत आहेत. आता दिल्ली शालेय शिक्षण स्थापन केलं जात आहे.
4) 'दिल्ली स्कूल ऑफ एज्युकेशन बोर्ड'ची (Delhi school of education board) स्थापना दिल्लीच्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल घडवून त्याला नवीन उंचीवर घेऊन जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Delhi, Education