Home /News /national /

‘देश के गद्दारों को गोली मारो’ भाजप मंत्र्याला ही घोषणा पडली महागात, निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितला रिपोर्ट

‘देश के गद्दारों को गोली मारो’ भाजप मंत्र्याला ही घोषणा पडली महागात, निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितला रिपोर्ट

अर्थ राज्य मंत्री म्हणाले, ‘देश के गद्दारों को’ ज्यावर रॅलीत उपस्थित राहिलेल्यांनी ‘गोली मारो’ असं प्रत्युत्तर दिलं

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल मिश्रानंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची चिथावणीखोर वक्तव्ये चर्चेत आली आहेत. ज्यावर दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. रिठालाचे भाजप उमेदवार मनीष चौधरी यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीत आलेल्या लोकांना  अनुराग ठाकूर यांनी, ‘देश के गद्दारों को गोली मारो’ असा नारा देऊन त्यांना चिथावणी दिली. या रॅलीत अर्थ राज्य मंत्री म्हणाले, ‘देश के गद्दारों को’ ज्यावर रॅलीत उपस्थित राहिलेल्यांनी ‘गोली मारो’ असं प्रत्युत्तर दिलं. जनसभेत अनुराग ठाकूर यांनी लोकांना  शाहीनबागमध्ये CAA विरोधात सुरू असलेल्या प्रदर्शन आणि विवादास्पद नारे देण्यास प्रवृत्त केले. इतकचं नाही तर ठाकूर यांनी मोठ्या आवाजात हे नारे देण्याचे आवाहन केले. चिथावणीखोर घोषण दिल्याच्या आरोपाखाली ठाकूर निवडणूक आयोगाच्या निशाण्यावर आले आहेत. यावर वरिष्ठ वकील आणि 'आप'चे माजी नेता प्रशांत भूषण म्हणाले, की अशा व्यक्ती मंत्रिमंडळात नाही तर तुरुंगात असायला हवेत. भाजपला संसदत असेच अशिक्षित नेते मिळतात. दुसरीकडे भाजपला टीका करीत दिल्ली कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख कीर्ती आझाद म्हणाले की भगव्या दलाचे नेते खरे गद्दार आहेत. ते शांती आणि लोकांच्या एकतेत फाटाफूट आणण्याचे काम करीत आहेत. अशी विवादास्पद घोषणा कपिल मिश्रांसारखे भाजपचे कनिष्ठ नेता देत आले आहेत. मात्र असं पहिल्यांदा झालं आहे की केंद्रीय मंत्री स्तरावरील पक्षाच्या नेत्याने असे कृत्य केले. भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांना तर निवडणूक प्रचारातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दिल्लीच्या मॉडल टाऊनमधून भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी ट्विट केले होते की 8 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होईल. त्यानंतर पुढील 48 तासांसाठी मिश्रा यांना निवडणूक प्रचारातून बाहेर करण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anurag thakur, Delhi election, भाजप

    पुढील बातम्या