नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : दिल्लीत सुरू असलेल्या CAA आणि NRC विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. चांदबाग येथील आंदोलनस्थळी जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर चांदपूर इथं झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या आणखी एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी आणि तीन नागरिक अशा एकूण चार जणांचा आतापर्यंत दिल्लीच्या हिंसाचारामध्ये मृत्यू झाला आहे.
हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर आता शाहदराचे डीसीपी अमित शर्मा हे जखमी झाले असल्याची माहिती आहे. तर इतर तीन नागरिकांचा या हिंसाचारामध्ये मृत्यू झाला आहे.
#UPDATE According to Delhi Police, total 4 people (3 civilians & 1 police head constable) have lost their lives today in clashes in North-East Delhi https://t.co/bYinl2Qxgm
— ANI (@ANI) February 24, 2020
उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सुरू असलेल्या CAA आणि NRC विरोधी आंदोलनात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नाव घेत नाहीये. आजही सकाळपासूनच या परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दुपारी जमाव हिंसक झाला आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांच्या मृत्यू झाला. दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता तब्बल 10 ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
मौजपूरमध्येही पुन्हा दगडफेक
दिल्लीतील मौजपूरमधील वातावरण पुन्हा एकदा तणावग्रस्त झाले आहे. इथंही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या गदारोळानंतर सोमवारीदेखील निषेध सुरू आहे. नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) चे समर्थक आणि स्थानिक लोक मौजपुरमधील मंदिराशेजारी रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा- देशभरात NIAचे 20 ठिकाणी छापे, ISISचं रॅकेट उद्धवस्त
लोकांनी रस्ता रोखला आहे आणि माइकवरून जयश्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मंगळवारपासून इथे दररोज हनुमान चालीसाचं पठण होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. झालेल्या दगडफेकीमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.