कर्ज फेडण्यासाठी व्यवसायिकानं दिली स्वत:च्या हत्येची सुपारी, काय आहे प्रकरण

पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.

पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 जून : कर्ज थकवण्यासाठी कोण कधी काय करेल याचा नेमकं नाही. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपण काढलेल्या इंश्युरन्स पॉलिसेचे पैसे कुटुंबीयांना मिळावेत आणि त्यांच्या डोक्यावरचं कर्ज फिटावं यासाठी दिल्लीमध्ये योजना आखून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीतील पटपडगंज इथून 9 जूनला व्यावसायिक गौरव बन्सल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. बेपत्ता रणहौला यांचा मृतदेह झाडावर सापडल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह 4 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. उद्योजक गौरव बन्सल कर्जबाजारी होता, असा पोलिसांचा दावा आहे. त्यानं काढलेल्या विम्याची रक्कम खूप मोठी होती. ही रक्कम मिळाली तर आपलं कुटुंब कर्जातून मुक्त होईल असा विचार करून व्यवसायिकानं स्वत:च्या हत्येची सुपारी दिली. या अल्पवयीन मुलाने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीनं व्यवसायिकाची हत्या केली. पोलिसांना व्यवसायिकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत झाडावर मिळाला. हे वाचा-सावधान! तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर? CBI नं केलं अलर्ट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी मृतदेह झाडावर मृतदेह सापडल्यानंतर मृताचे नाव गौरव बन्सल असल्याचं चौकशीत समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी सूरज मनोज, सुमित आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून गौरव बन्सल यांची हत्या केली. गौरव यांनी त्यासाठी या चौघांना आधीच पैसे देण्याची ऑफर दिली होती. गौरव यांचा जवळपास एक ते दीड कोटींचा विमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा विमा मिळाल्यानंतर कर्ज फिटेल आणि कुटुंबीय त्या कर्जातून मुक्त होतील यासाठी हा सगळा डाव रचल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या हत्येची सुपारी देण्यासाठी व्यवसायिक गौरव यांनी सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका अल्पवयीन मुलाशी संपर्क केला. व्यवसायिकाने आपला सगळ्या हत्येचा प्लॅन मुलांना सांगितला आणि ठरल्या प्रमाणे त्यांनी रणहौला जात असल्याची माहितीही आरोपींपर्यंत पोहोचवली होती. आरोपींनी प्लॅननुसार व्यवसायिकाची हत्या करून झाडावर मृतदेह सोडून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार पोलीस तपास उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हे वाचा-पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आरोपींची नवी माहिती समोर हे वाचा-पाककडून भारतीय दूतावासातील 2 अधिकाऱ्यांचा छळ, हात-पाय बांधून मारहाण संपादन- क्रांती कानेटकर
    First published: