VIDEO : 'फिर एक बार, मोदी सरकार', भाजपची नवीन टॅगलाइन लाँच

लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपनं आपली नवीन टॅगलाइन लाँच केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:14 PM IST

VIDEO : 'फिर एक बार, मोदी सरकार', भाजपची नवीन टॅगलाइन लाँच

नवी दिल्ली, 7 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपकडून आपली नवीन टॅगलाइन आणि थीम सॉन्ग लाँच करण्यात आलं आहे. 'फिर एक बार, मोदी सरकार', असं म्हणत भाजपनं पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत टॅगलाइनची घोषणा केली. लोकसभा निवडणूक 2014मध्ये 'अब की बार मोदी सरकार' या टॅगलाइनसहीत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. 2014मध्ये ही टॅगलाइन प्रचंड गाजलीदेखील होती. राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढा आणि सामाजिक योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील, असंही जेटलींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही पाच वर्षांत एकदाही टॅक्समध्ये वाढ केलेली नाही. आमच्या सरकारने मध्यम वर्गाला प्रचंड दिलासा दिला आहे. तसंच आमचा काम करण्यावर विश्वास आहे, असंही जेटली यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, यावेळेस जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही टीका केली. 'काँग्रेसने 72 वर्षांत काहीच काम केलेले नाही. आम्ही पाच वर्षांत खूप काम करून दाखवलेली आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून धक्का बसतो. कारण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यम वर्गांसाठी काहीच नाही. देशाच्या जनतेला निश्चित करायचे आहे की त्यांना मजबूत सरकार हवं आहे की मजबूर सरकार', असं म्हणत जेटलींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. दुसरीकडे काँग्रेसनंही आपली टॅगलाइन घोषित केली.  'अब होगा न्याय' ही काँग्रेसची टॅगलाईन आहे.


Loading...
वाचा अन्य बातम्या

धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते - पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

VIDEO : 'तुम्ही 1 लाख मतांनी पराभूत होणार', चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीवर उदयनराजे म्हणतात...

एक दोन नव्हे तब्बल 38 देशांमध्ये प्रदर्शित होणार PM Narendra Modi बायोपिक

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...