नवी दिल्ली, 01 जुलै : भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता 1108 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजपनं केला आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्य सहभागी असलेल्या घोटाळ्याचा खुलासा करत आहोत. ‘माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शाळांमधील खोल्या बांधण्यासाठी अतिरिक्त 2000 कोटी रूपये दिले गेले. पण, त्यासाठी केवळ 892 कोटींचीच गरज होती. त्यामध्ये 1108 कोटींचा घोटाळा झाला आहे. शिवाय, ज्या 34 जणांना कंत्राट दिलं गेलं त्यामध्ये त्यांचे नातेवाईक देखील सहभागी’ असल्याचं म्हटलं. या घोटाळ्यामध्ये मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचं देखील नाव घेतलं.
BJP MP Manoj Tiwari: We're exposing a scam in which Delhi CM & Dy CM are involved. An RTI has revealed that extra Rs 2000 cr was given for constructions of rooms in schools that could've been constructed in only Rs 892 cr. 34 contractors given the task include their relatives pic.twitter.com/92ZkPiQav7
दिल्लीच्या विधानभा निवडणुका आता तोंडावर आल्या असून आरोप – प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे.
आणखी काय म्हणाले तिवारी?
घर घेताना 1500 रूपये क्वेअर फिटचा भाव लागतो. पण, केजरीवाल सरकार 8800 रूपये दरानं शाळांच्या खोल्या बांधत असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला. चांगल्या हॉटेल्सच्या खोल्यांचं बांधकाम देखील 5 हजार रूपये क्वेअर फिटनं होतं. या ठिकाणी दिल्लीतील जनतेनं दिलेल्या टॅक्सचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
VIDEO: माणुसकी यांना माहितच नसेल, रुग्णाचा तासभर तडफडून मृत्यू