Home /News /national /

दिल्लीत भाजपच्या कार्यालयात कोरोनाचा उद्रेक, प्रदेशाध्यक्षांसह 17 जण पॉझिटिव्ह

दिल्लीत भाजपच्या कार्यालयात कोरोनाचा उद्रेक, प्रदेशाध्यक्षांसह 17 जण पॉझिटिव्ह

आदेश गुप्ता यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी सुद्धा कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

    प्रियंका काण्डपाल, प्रतिनिधी नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : नवी दिल्लीत कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता (Delhi BJP President Adesh Gupta) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आदेश गुप्ता यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असल्याचा आढळून आला आहे. आदेश गुप्ता यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी सुद्धा कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. वर्ध्यात 'जनता कर्फ्यू'ला काँग्रेसचा विरोध, भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या मुख्यालयातील काम करणारे जवळपास 12 पेक्षा अधिक कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सर्वांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे भाजपचे मुख्यालय हे सेनिटायझेशन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी ट्वीट करून 'आपल्याला मागील आठवड्यात ताप आला होता. त्यानंतर कोविड चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण त्यानंतर आणखी अस्वस्थ वाटायला लागले होते. त्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळून आला आहे.' अशी माहिती दिली. तसंच, 'आपण मागील आठवड्याभरापासून क्वारंटाइन आहोत. माझ्या संपर्कात जे कुणी आले असेल त्यांनी समोर येऊन माहिती द्यावी आणि आपली चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केले. 'हा' निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, उदयनराजे केंद्रावर भडकले भाजपच्या कार्यालयामध्ये एकूण 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे.  त्यामुळे कार्यालय हे काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. याआधी दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सिसोदिया यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्याआधी दिल्लीतील तीन आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या