निवडणुकीआधी एका गाण्याने केजरीवालांची अडचण, भाजपकडून 500 कोटींचा दावा

निवडणुकीआधी एका गाण्याने केजरीवालांची अडचण, भाजपकडून 500 कोटींचा दावा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण तापले आहे. यातच आम आदमी पार्टीच्या गाण्यामुळे केजरीवालांची अडचण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानतंर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. आम आदमी पक्षाने एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर रविवारी दिल्ली भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दिल्ली भाजपने आम आदमी पक्षाला मानहानीची नोटीस पाठवली असून 500 कोटी रुपयांचा दावा केला आहे.

आपने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांचा डान्स आहे. या डान्सच्या बॅकग्राउंडला आम आदमी पक्षाचे प्रचारगीत लावण्यात आलं आहे. मनोज तिवारी यांचा व्हिडिओ एका भोजपुरी अल्बममधील आहे. याचा वापर करून लगे रहो केजरीवाल या प्रचारगीताचे बँकग्राउंड म्युझिकसह व्हिडिओ तयार कऱण्यात आला आहे.

मनोज तिवारी यांनी म्हटलं की, आम आदमी पार्टीला त्यांच्या थीम साँगसाठी माझ्या व्हिडिओचा वापर करण्याचा अधिकार कोणी दिला. व्हिडिओ प्रकऱणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच अब्रू नुकसानीचा दावा करत 500 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली.

भाजप नेते नीलकांत बक्षी यांनी म्हटलं की, आपच्या प्रचार मोहिमेत मनोज तिवारी यांच्या चेहऱ्याचा वापरच सांगतो की केजरीवाल यांच्यापेक्षा तिवारींची लोकप्रियता जास्त आहे.

दिल्लीतील 70 विधानसभेच्या जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 11 फेब्रुवारीला लागणार आहेत. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून यासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची गरज असेल. दिल्लीत एकूण 1.46 कोटी मतदार आहेत.

DSP ला दहशतवाद्यांसारखीच वागणूक दिली जाणार : जम्मू काश्मीर पोलीस

Published by: Suraj Yadav
First published: January 13, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading