मराठी बातम्या /बातम्या /देश /

Delhi Election : दिल्लीत आपविरुद्ध भाजप, 5.30 वाजेपर्यंत 54.15 टक्के मतदान

Delhi Election : दिल्लीत आपविरुद्ध भाजप, 5.30 वाजेपर्यंत 54.15 टक्के मतदान

विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार रिंगणात, आपविरुद्ध भाजप अशी रंगणार चुरशीची लढत...

विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार रिंगणात, आपविरुद्ध भाजप अशी रंगणार चुरशीची लढत...

विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार रिंगणात, आपविरुद्ध भाजप अशी रंगणार चुरशीची लढत...

    नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Elections 2020) 70 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 5.30 वाजेपर्यंत 54.15 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 15,750 मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील 47 लाख 86 हजार 389 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीमध्ये आपविरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता आणखी एक राज्य भाजपच्या हातून निसटणार की भाजप आपलं कमळ राजधानी दिल्लीत फुलवण्यात यशस्वी होणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. तर दुसरीकडे आपचं सरकार येणार असल्याचा कौल नवी दिल्लीतील जनतेनं दिली आहे. घोडा मैदान लांब नाही, अवघ्या 3 दिवसांत म्हणजेच 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. हेही वाचा-'दंड्यापासून वाचण्यासाठी माझ्याकडे सुरक्षा कवच', राहुल गांधींना मोदींचं उत्तर सोशल मीडियावरही असणार पोलिसांची करडी नजर सोशल मीडियावरही पोलिसांची नजर राहणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ नये यासाठी सीएपीएफच्या 190 जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच विशिष्ट विशेष निवडणूक कर्तव्यावर सुमारे 40,000 जवान तैनात केले आहेत. त्याशिवाय मतदान केंद्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात स्थानिक पोलिसांसह मतदान केंद्रान एक हजार होमगार्ड्स मदत करणार आहे. शाहीनबागच्या मुद्द्यावरून दिल्लीत मतांचे ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या भाजपच्या त्रिकूटाची आज, शनिवारी होत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीपुढे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक पूर्ण होईल, असा ठाम विश्वास 'आप'च्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा-Coronavirus वर इलाज शोधणाऱ्या टीमला पहिलं यश; भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्व
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: AAP, Arvind kejriwal, BJP, Congress, Delhi assembly election, Delhi news, Delhi police, PM narendra modi

    पुढील बातम्या