मराठी बातम्या /बातम्या /देश /

Delhi Election : केजरीवाल टिकणार की अमित शहा दिल्लीचं तख्त ताब्यात घेणार? 11 फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Delhi Election : केजरीवाल टिकणार की अमित शहा दिल्लीचं तख्त ताब्यात घेणार? 11 फेब्रुवारीला होणार स्पष्ट

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 70 पैकी 67 जिंकणारे 'आप'चे केजरीवाल पुन्हा येणार का हे 11 फेब्रुवारीला समजेल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 70 पैकी 67 जिंकणारे 'आप'चे केजरीवाल पुन्हा येणार का हे 11 फेब्रुवारीला समजेल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 70 पैकी 67 जिंकणारे 'आप'चे केजरीवाल पुन्हा येणार का हे 11 फेब्रुवारीला समजेल.

  • Published by:  Arundhati Ranade Joshi

दिल्ली, 6 जानेवारी : राजधानी दिल्ली काबीज करण्यासाठी राजकीय युद्ध लवकरच सुरू होणार आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार  6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होईल. या दिवशी मतदान होईल तर  रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

सध्याच्या दिल्ली  विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारीला संपत आहे. त्याच्या आधी दिल्लीमध्ये नवं राज्य सरकार स्थापन होणं आवश्यक आहे. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत 36 जागा मिळवणाऱ्या पक्षाला बहुमत मिळेल. दिल्लीतल्या मतदारांची संख्या आता 1,46,92,136 इतकी झाली आहे.

आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल सरकारला आपण पुन्हा पाच वर्षांसाठी परत येऊ असा विश्वास आहे, तर भाजपने या वेळी दिल्ली हातून न सोडण्याचा निश्चय केला आहे. काँग्रेसने दिल्लीच्या राजकारणात परतण्याचं स्वप्न बाळगून आहे.

NRC, सुधारित नागरिकत्व कायदा, वायू प्रदूषण, महिलांची सुरक्षा या विषयांबरोबरच या वेळी राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळण्याचा मुद्दासुद्धा निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

वाचा - JNUमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला 26/11ची आठवण करून देणारा - उद्धव ठाकरे

'आप'ला 2015 मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून अरविंद केजरीवाल यांनी  प्रचंड बहुमत दिलं होतं. या वेळी 70 जागा जिंकून इतिहास घडवण्याचं आपचं स्वप्न आहे. त्यांनी गेल्या महिन्यात प्रचारालाही सुरुवात केली आहे. 'अच्छे बीते 5 साल. लगे रहो केजरीवाल' अशी त्यांची या वेळच्या प्रचारमोहीमेची लाइनही ठरलेली आहे.

भाजपसाठी स्टार कँपेनर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा आहे. रामलीला मैदानावर गेल्या महिन्यात सभा घेऊन भाजपनेही प्रचाराचा नारळ फोडला आहे. भाजपसाठी NRC, CAA आणि राष्ट्रवाद हे प्रचाराचे मोठे मुद्दे ठरतील. तर 'आम' सामान्यांना जिव्हाळा असणारे - वीज, पाणी, प्रदूषण प्रश्न प्राधान्याने प्रचार मोहिमेत घेईल अशी शक्यता आहे.

----------------------

अन्य बातम्या

JNU: धक्कादायक खुलासा, हिंसाचारावेळी हल्लेखोरांनी वापरला कोडवर्ड

ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 576 कोटींचे बक्षिस, सुलेमानीच्या हत्येचा घेणार बदला

'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, अभिमान वाटावा असा VIDEO

'ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, नाहीतर...', शिवसेना नेत्याचा घणाघात

First published:

Tags: AAP, Delhi (Indian Union Territory), Delhi election