Delhi Election Result Live : शाहीनबागच्या मतदारसंघात कुणाला लागला करंट? जाणून घ्या कोण जिंकलं

Delhi Election Result Live : शाहीनबागच्या मतदारसंघात कुणाला लागला करंट? जाणून घ्या कोण जिंकलं

दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप (AAP)58 तर भाजप (BJP) 12 जागांवर आघाडीवर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सर्व जागांवरील सुरुवातीचा कल समोर आला आहे. सुरुवातीला आलेल्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला आघाडी मिळताना दिसत आहे. दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप (AAP)58 तर भाजप (BJP) 12 जागांवर आघाडीवर आहे.

CAA आणि NRC विरोधाचं केंद्र झालेली शाहीनबाग ज्या विधानसभा मतदारसंघात येते त्या 'ओखला' मतदारसंघात कोणता पक्ष बाजी मारणार याची अनेकांना उत्सुकता होती. मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर काही काळ या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने आघाडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कारण हा मतदारसंघ मुस्लीम बहुल भाग समजला जातो.

सध्या देशभरातील मुस्लीम समाजाचा एक मोठा भाग CAA आणि NRC कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनाचं केंद्र असेलेल्या शाहीन बागच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराने सुरुवातील आघाडी घेतली होती. मात्र नंतर हे चित्र पालटलं. या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे अमनतुल्लाह खान विजयी झाले आहेत.

मागील निवडणुकीत ओखला मतदारसंघातून आपच्या अमनतुल्लाह खान यांनी विजय मिळवला होता. तेच यंदाही या मतदारसंघातून आपचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात आप आणि काँग्रेसमध्ये मतांचं विभाजन झाल्याने सुरुवातीला भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचं बोललं होतं. मात्र भाजपच्या उमेदवाराला ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवता आली नाही.

दरम्यान, 2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

First published: February 11, 2020, 9:53 AM IST
Tags: AAPBJP

ताज्या बातम्या