'मोदींनी आवाहन केलं आणि दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं'

'मोदींनी आवाहन केलं आणि दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं'

मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र बऱ्य़ापैकी स्पष्ट झालं असून आतापर्यंतच्या कलानुसार आम आदमी पार्टी पुन्हा एकदा सत्ता मिळवणार, असं चित्र आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिल्लीचा कल स्पष्ट होत असताना राष्ट्रवादीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'धन, बल और छल हार गया, विकास और विश्वास जीता,' असं ट्वीट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. तसंच मलिक यांनी निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका आवाहनाचाही उल्लेख केला आहे.

'मोदीजींनी दिल्लीतील निवडणुकीत आवाहन केलं होतं की देशद्रोह्यांविरोधात मतदान करा. आता जनतेनं मोदींनी दिलेला सल्ला मानत दिलेल्या मतदानातून भाजपला देशद्रोही घोषित केलं आहे,' असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप (AAP)50 तर भाजप (BJP) 20 जागांवर आघाडीवर आहे. एकीकडे मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे भाजपने निकाल येण्याआधीच पराभव स्वीकारला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागवण्यात आलेला एक पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टरवर भाजपचे माजी अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच त्याच्यावर लिहिलं आहे की, 'विजयामुळे आम्ही अहंकारी होत नाही अन् पराभवामुळे निराश होत नाही.' अमित शहांचा फोटो असणारं हे पोस्टर आता व्हायरल होत असलं तरीही हे पोस्टर 2 वर्षांपूर्वीचं असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचेही असेच फोटो लावण्यात आले आहेत.

First published: February 11, 2020, 11:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading