LIVE NOW

LIVE Delhi Election Result 2020 : 'आप'ला विक्रमी बहुमत, भाजपची 7 जागांवर घसरण

अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून भाजपने दिल्ली काबिज करण्याचं पाहिलेलं स्वप्न भंगलं आहे.

Lokmat.news18.com | February 11, 2020, 4:36 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 11, 2020
auto-refresh

Highlights

4:36 pm (IST)

विजयी जल्लोषानंतर अरविंद केजरीवाल जेव्हा हनुमानाचे आभार मानतात


4:12 pm (IST)

दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You - अरविंद केजरीवाल


3:13 pm (IST)

पाहा कोण हरलं, कोण जिंकल?


3:12 pm (IST)

पाहा कोण हरलं, कोण जिंकल?


Load More
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election Results 2020 ) निकाल स्पष्ट झाले असून दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना पुन्हा 'आप'लसं केलंय. विधानसभेच्या 70 जापैकी आम आदमी पक्षाला बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने आपला आलेख थोडा उंचावला असून 2015 पेक्षा पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची स्थिती जैसे थे असून काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही. एक्झिट पोल्सनी दाखवलेल्या अंदाजानुसारच सर्व निकाल लागले हे स्पष्ट झालंय. मतमोजणीच्या सुरुवातीलाच 'आप'च्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती. 2015मध्ये फक्त 03 जागा मिळाल्या होत्या. भाजपने सुरुवातीला आघाडी घेतली होती मात्र नंतर घसरण सुरु झाली.  'आप'ने  63 जागांवर आघाडी घेतलीय. या आधी 'आप' तब्बल 67 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली असली तरी त्या मानाने त्यांना जास्त जागा मिळालेल्या नाहीत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पटपडगंजमधून जिंकले असून सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते. अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून भाजपने दिल्ली काबिज करण्याचं पाहिलेलं स्वप्न  भंगलं आहे. गेल्या 22 वर्षांपासून दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाही तर अरविंद केजरीवाल यांचीच सत्ता चालल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. जस जसे निकाल यायला लागले तस तसं 'आप'ची आघाडी स्पष्ट होऊ  लागली. त्यामुळे 'आप'च्या कार्यालयात जल्लोषाचं वातावरण होतं. फटाके फोडले जात होते,  मिठाई भरवली जात होती. तर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जनतेचा कौल मान्य असल्याचं सांगितलं.  
corona virus btn
corona virus btn
Loading