Delhi Election Result Live : पराभूत झालेल्या काँग्रेसमुळे भंगलं भाजपचं स्वप्न, अरविंद केजरीवालांच्या विजयाचं हे आहे खरं समीकरण

Delhi Election Result Live :  पराभूत झालेल्या काँग्रेसमुळे भंगलं भाजपचं स्वप्न, अरविंद केजरीवालांच्या विजयाचं हे आहे खरं समीकरण

लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकहाती विजय मिळवणाऱ्या भाजपला नक्की कशाचा फटका बसला याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टी (AAP) बहुमताच्या दिशेने कूच करत असल्याचे कल आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत पराभवाच्या दिशेने जात असल्याने भाजपला धक्का बसला आहे. अशातच मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकहाती विजय मिळवणाऱ्या भाजपला नक्की कशाचा फटका बसला याची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी सरकारने मागील पाच वर्षांपासून केलेली कामे जनतेसमोर ठेवली आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार करणारी भाजप बॅकफूटवर गेली. भाजपच्या दिल्लीतील पराभवामागे हे एक महत्त्वपूर्ण कारण तर आहेच पण त्यासोबत दिल्लीतील पक्षीय समीकरणही भाजपसाठी डोकेदुखी ठरले.

काँग्रेसने केली भाजपची निराशा

दिल्लीतील यंदाची विधानसभा निवडणूक थेट आप विरुद्ध भाजप अशी झाली. निवडणुकीत काँग्रेस पूर्णपणे प्रभावहीन ठरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजपविरोधी मतांचं धृवीकरण न होता ही मते एकगठ्ठा केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मिळाली. जेव्हा विरोधी मतांचं धृवीकरण होतं तेव्हाच दिल्लीत भाजपला फायदा होतो, असा इतिहास आहे.

'मोदींनी आवाहन केलं आणि दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं', राष्ट्रवादीची टीका

1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता दलाने अनेक जागांवर काँग्रेसची मते आपल्याकडे खेचली होती. याचाच भाजपला मोठा फायदा झाला आणि भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादित केला. मात्र यंदा काँग्रेसच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून ही मते 'आप'कडे वळल्याचं दिसत आहे.

First published: February 11, 2020, 12:06 PM IST

ताज्या बातम्या