अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून झाडाझडती

अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून झाडाझडती

दिल्लीच्या राजकीय इतिहासात शुक्रवारी एक नवा अध्याय लिहिला गेला. दिल्ली पोलिसांनी थेट मुख्यमंत्री निवासस्थानावर धड़क देत मुख्यमंत्र्यांच्या घराची आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

  • Share this:

सागर वैद्य, दिल्ली, 23 फेब्रुवारी : मुख्य सचिव अंशु प्रकाश मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन पोहचलंय. थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचं पथक पोहचल्याने दिल्लीतले राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

दिल्लीच्या राजकीय इतिहासात शुक्रवारी एक नवा अध्याय लिहिला गेला. दिल्ली पोलिसांनी थेट मुख्यमंत्री निवासस्थानावर धड़क देत मुख्यमंत्र्यांच्या घराची आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण झाल्या प्रकरणाचा चौकशीचा फार्स थेट केजरीवाल यांच्या मुख़्यमंत्री निवासपर्यंत पोहचल्याने आम आदमी पक्षाचा तिळपापड होण स्वाभाविक होतं.

केजरीवाल आणि आपने ट्वीट करून दिल्ली पोलिसांनी लोकशाहीचा खून केल्याच सांगत भाजपाला लक्ष्य केलं. पोलिसांनी नूतनीकरण केलं का यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप 'आप'ने केले.

जस्टिस लोया प्रकरणात अमित शहांची चौकशी करायचीही हिम्मत दाखवा असं ट्वीट करून केजरीवाल यांनी या चौकशीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

तर सोशल मीडियांवर आपची आदळ आपट सुरू होती आणि तिकडे तब्बल 2 तास दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल निवासातील 4 कर्मचाऱ्यांची चौकशी करत 21  सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले. फाॅरेंसिकच पथक ही दाखल झालं होतं. दुपारी 2 च्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेज घेवून दिल्ली पोलिसांच पथक मुख्यमंत्री निवासतून निघालं. मात्र, त्यानंतर आपने देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव  केजरीवाल यांच्या मदतीसाठी धावून आले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपल्यावर होत असलेले एकतर्फी कारवाईचे आरोप फेटाळून लावले. 7 कॅमरे नादुरुस्त होते. त्यात रेकॉर्डिंग झालेल नाही. 21 कॅमेऱ्यांचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पूर्व सूचना देवून चौकशीसाठी आलो होतो आरोप चुकीचे असं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

'आप'च्या आमदाराचा जामीन फेटाळला

दरम्यान, आयएएस अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृह मंत्र्यांना भेटून आपला विरोध व्यक्त करत होते. त्यात आम आदमी पार्टीला अजून एक मोठा धक्का बसला. मुख्य सचिव मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या दोन्ही आमदारांचा जामीन नाकारला. आमदार जरवाल आणि खान यांना 14 दिवस न्यायालयीन कोठड़ी सुनावली. त्यामुळे दिल्लीतले आप सरकार बरखास्तीच्या मार्गाकडे चाललं आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 06:06 PM IST

ताज्या बातम्या