CAA आंदोलनात थेट पोलिसावर पिस्तुल रोखणाऱ्या तरूणाचा VIDEO समोर

CAA आंदोलनात थेट पोलिसावर पिस्तुल रोखणाऱ्या तरूणाचा VIDEO समोर

दिल्ली पोलीस सातत्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : उत्तर पूर्व दिल्लीतील काही भागांमध्ये सुरू असलेलं CAA विरोधातील आंदोलन हिंसक झालं आहे. मौजपूर, कर्दमपुरी, चांद बाग आणि दयालपुर या परिसरामध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र असं असलं तरही मौजपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण थेट पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखल्याचं दिसत आहे.

मौजपूरमध्ये एका तरूणाने आधी हवेत गोळीबार केला. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्या तरुणाने थेट पोलिसावर पिस्तुल रोखलं आणि पुन्हा हवेत गोळीबार केला. या सर्व प्रकारामुळे दिल्लीतील अनेक भागात तणावाचं वातावरण असून दिल्ली पोलीस सातत्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक भागांमध्ये जमावबंदीही करण्यात आली आहे.

CAA आंदोलनातील हिंसेचा भडका

CAA आणि NRC विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. चांदबांग येथील आंदोलनस्थळी जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रतन लाल असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून दडफेकीत ते गंभीर जखमी झाले होते.

उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सुरू असलेल्या CAA आणि NRC विरोधी आंदोलनात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नाव घेत नाहीये. आजही सकाळपासूनच या परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दुपारी जमाव हिंसक झाला आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांच्या मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 10:32 PM IST

ताज्या बातम्या