नवी दिल्ली, 18 मार्च: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (Rcom) स्वीडनची टेलिकॉम कंपनी एरिक्सनला 462 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने RCom ने एरिक्सनला 462 कोटी द्यावेत असे आदेश दिले होते. यासाठी 19 मार्च ही शेवटची तारीख दिली होती. तर Rcomने या कालावधीत पैसे दिले नसते तर अनिल अंबानी यांना तुरुंगात जावे लागले असते.
Rcomने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पहिल्या आदेशानुसार 118 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम Rcomने जमा केली होती. Rcomने एरिक्सन कंपनीचे 571 कोटी रुपये द्यायचे होते. यातील 550 कोटी ही मुळ रक्कम होती तर 21 कोटी व्याज म्हणून द्यायचे होते.
सर्वोच्च न्यायालयाने पैसे देण्याचे आदेश देण्याआधी अनिल अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप आणि एल अॅन्ड टी फायनान्स व एडलवाइस ग्रुपमधील काही कंपन्यांसोबत वाद झाला होता.
अनिल अंबानी यांनी मानले मुकेश आणि निता अंबानी यांचे आभार
गेल्या काही दिवसांमध्ये मला मोलाची साथ दिल्याबद्दल थोरले बंधू मुकेश आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कठीण परीक्षेच्या काळात एक कुटुंब म्हणून त्यांनी मला मोलाची साथ दिली. त्यांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे मी व माझे कुटुंबीय त्यांचा मी ऋणी आहे, असे अनिल अंबानी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
VIDEO: पर्रिकरांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप