मराठी बातम्या /बातम्या /देश /

उड्डाणावेळीच अचानक इंडिगो विमानाखाली घुसली कार, दिल्ली विमानतळावरील घटनेचा धक्कादायक VIDEO

उड्डाणावेळीच अचानक इंडिगो विमानाखाली घुसली कार, दिल्ली विमानतळावरील घटनेचा धक्कादायक VIDEO

धक्कादायक! उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानाखाली घुसली कार,  दिल्ली विमातळावर मोठा अनर्थ टळला

धक्कादायक! उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानाखाली घुसली कार, दिल्ली विमातळावर मोठा अनर्थ टळला

Delhi airport accident: दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर मंगळवारी सकाळी मोठा अपघात होता होता टळला. गोफर्स्ट एअरलाईन्सच्या ग्राऊंड स्टाफची एक कार थेट विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
दिल्ली, 2 ऑगस्ट: दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर (Indiara Gandhi international Airport, Delhi) मंगळवारी सकाळी मोठा अपघात (Accident) होता होता टळला. गोफर्स्ट एअरलाईन्सच्या ग्राऊंड स्टाफची एक कार थेट विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या (Indigo Airlines) पुढच्या चाकाखाली घुसली. क्रू मेंबर्स आणि पायलट यांना एअरपोर्टमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी विमानतळावर असलेली कार टर्मिनल 2 वर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाला धडकली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या घटनेनं विमानतळावर एकच गोंधळ उडाला. आज सकाळी इंडिगो एअरलाईनचं विमान ए३२० निओ उड्डाणासाठी सज्ज होतं. दरम्यान अचानक गो फर्स्ट एअरलाईन्सची कार थेट उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसली. विमान उभं असल्यामुळं मोठा अनर्थ होता होता टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेनं विमानतळावर एकच खळबळ उडाली. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमी गडबजलेलं असतं. अनेक एअरलाईन्सची विमानं विमातळावरावर येत असतात. या विमानांचा सर्व्हिस स्टाफदेखील विमानतळावर उपस्थित असतो. आज सकाळी गो फर्स्ट एअरलाईन्सच्या ग्राउंड स्टाफची कार अचानक विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसून अपघात झाला. अचानक घडलेल्या या अपघातामुळं विमानतळावर एकच गोंधळ उडाला. सुरक्षेची एवढी चोख व्यवस्था असतानाही अशी घटना घडल्यानं विमानतळावर होती. दरम्यान काही लोकांनी विमानाखाली गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीकार घुसल्याचा व्हिडीओ काही लोकांनी शूट केला. यामध्ये कार विमानच्या खाली घुसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. डिजिसीएकडून या घटनेची चौकशी केली जात असून प्राथमिक अंदाजानुसार गो फर्स्टच्या कार ड्रायव्हरच्या चुकीमुळं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा-  Suicide :‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीनं गळफास घेत संपवलं आयुष्य दरम्यान अचानक गो फर्स्ट एअरलाईन्सची कार थेट उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसून झालेल्या अपघातानंतर ल्ली विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी लोकांसमोर येत आहेत. एवढी चोख सुरक्षाव्यवस्था असतानाही हा अपघात झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे विमान उभं असल्यामुळं मोठा अनर्थ होता होता टळला. या अपघातानं कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी या घटनेनं विमानतळावर एकच खळबळ उडाली.  डिजिसीएकडून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. चौकशीअंती हा अपघाताचं कारण समोर येईल.
First published:

Tags: Accident, Airport, Delhi

पुढील बातम्या